crime

सरपंच किडनॅप !

लवासा सिटीतील दासवे गावचे सरपंच शंकर धेंडले यांचं अपहरण करून चोरट्यांनी ४७ लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील धायरी भागात राहणाऱ्या धेंडले यांचं पाच चोरट्यांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांना दूरवर नेऊन मारहाण करण्यात आली.

Nov 1, 2011, 01:00 PM IST

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबईत गोरेगावमध्ये बलात्कार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या घरामध्येच अल्पवयीन मुलीचा मृतदेह लपवला होता. शेजाऱ्यांना घटना कळताच त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं.

Oct 29, 2011, 11:04 AM IST

भाऊबीजेलाच भावाची हत्त्या

दोन भावांमधल्या भांडणात एका भावाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्याच्या शुल्लक कारणावरुन छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात हातोडा मारुन त्याचा खून केला.

Oct 29, 2011, 10:25 AM IST

खासदार उदयनराजे भोसलेंवर गुन्हा

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या सीईओंना मारहाण केली. मारहाणीच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 23, 2011, 05:18 AM IST