crime

दक्ष नागरिकांनी पकडले चोर

चौघाजणांनी महेश वर्मा यांना वाटेत अडवून त्यांच्याजवळील बॅग हिसकावली आणि ते पसार झाले. मात्र काही दक्ष नागरिकांनी या चोरांचा पाठलाग केला आणि त्या चौघा चोरापैकी दोघे हे नागरिकांच्या हाती लागले.

Dec 1, 2011, 10:40 AM IST

रोडरोमिओचा हल्ला

पत्नीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला ध़डा शिकविण्यासाठी गेलेल्या बिपीन यांना आरोपीने मारहाण करत त्यांचा बोटाला चावा घेतला आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंच्या या कृत्यामुळं नागरिकांध्ये दहशत पसरलीय.

Dec 1, 2011, 06:40 AM IST

नागपूरचे हाय प्रोफाईल चोर

चोरी करण्या आधी या टोळीने ठरल्याप्रमाणे घरातील सर्व लोकांबद्दलची माहिती काढली होती. त्यानंतर या टोळीने घटनेच्या दिवशी घरातील वॉचमनला दारु पाजून बेशुद्ध केलं आणि घरात प्रवेश मिळवला घरात प्रवेश मिळताच या चोरट्यानी घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात साफ केला.

Nov 29, 2011, 04:10 PM IST

घाटकोपरमध्ये भिंत आणि छप्पर फोडून चोरी

घाटकोपर भागात भिंत आणि छप्पर फोडून चोरी करणाऱ्या टोळीने खळबळ उडवून दिली आहे. केवळ २४ तासांत चार ठिकाणी डल्ला मारण्यात आलाय.विशेष म्हणजे एकाच परिसरातल्या चार दुकानांना लक्ष्य कऱण्यात आलंय.

Nov 29, 2011, 02:09 PM IST

'बडे मियाँ, छोटे मियाँ' अटक!

नागपूर पोलिसांनी अशा एका दुकलीला गजाआड केलंय, ज्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.विशेष म्हणजे या चोरांच्या टोळीवर पोलीस नजर ठेऊन होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती.

Nov 29, 2011, 01:27 PM IST

सेक्स स्कँडलचा पर्दाफाश

अमरावती जिल्ह्यातल्या धारणी इथं सेक्स स्कँडलचा पर्दाफाश झालाय. २७ वर्षीय तरूणीची अश्लील चित्रफीत काढून तिचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार इथं घडलाय. वेबसाईटवर या चित्रफीती अपलोड केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nov 26, 2011, 02:21 PM IST

वेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक

'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.

Nov 25, 2011, 08:38 AM IST

अनाथाश्रमात लैंगिक शोषण ?

कामशेत जवळ विद्यावती अनाथाश्रमातल्या ४५ अल्पवयीन मुलांची नावं बदलण्याचा प्रकार घडलाय. त्यांचं आडनाव बदलून अग्रवाल हे नाव लावण्यात आलंय. त्यामुळं खळबळ उडालीय.

Nov 24, 2011, 06:44 AM IST

निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.

Nov 23, 2011, 11:36 AM IST

पिंपरी चिंचव़डमध्ये 'मुन्नाभाई एमडी'

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे अनेक मुन्नाभाई असल्याचं खासगीत सांगितलं जातं. सामान्य़ रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अशा मुन्नाभाईंना शोधण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 23, 2011, 10:13 AM IST

बीडमध्ये चोर मुजोर, पोलीस कमजोर

झी २४ तास वेब टीम, बीड

 

Nov 21, 2011, 08:38 AM IST

वर्सोव्यात एकाला जीवंत जाळले

मुंबईतल्या वर्सोव्यात एकाला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. वर्सोवामधील सुंदरवाडी इथं काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या घटनेत, रेहमत शाह यांचा जागीच मृत्यू झाला. आपापसांतील भांडणातून हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2011, 05:32 AM IST

दिवसाढवळ्या दुकानात लूट!

औरंगाबादमध्ये मंदिराचा कळस चोरून नेण्याच्या घटनेला १२ तासही उलटले नाहीत तोवर एका व्यापा-याचे दिवसाढवळ्या ११ लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे. लागोपाठ चोरीच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबदच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Nov 8, 2011, 05:24 AM IST

संधी'साधू' गजाआड

मुलींना फसवणा-या एका भोंदूबाबाला अटक करण्यात आलीये. कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून हा भोंदूबाबा मुली आणि महिलांना त्याच्या घरी बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. या चोवीस वर्षाच्या इमामुद्दीन ठाकूरला पोलिसांनी अटक केली.

Nov 6, 2011, 06:48 AM IST

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nov 4, 2011, 01:34 PM IST