करणीच्या भीतीने पत्नीचा खून
करणीच्या भीतीनं एका माथेफिरुनं आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुरुवार पेठेत राहणाऱ्या विक्रम रसाळेनं आपल्या पत्नीचे चावे घेऊन आणि भिंतीवर डोके आपटून खून केलाय.
Mar 29, 2012, 09:27 PM ISTसांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर
सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली.
Mar 28, 2012, 10:17 PM ISTगृहमंत्र्यांच्या राज्यात गुंडांचा धुमाकुळ
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्षाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलावारीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय. रामचंद्र मदने या युवकाचं अपहरण झालंय.
Mar 28, 2012, 08:53 PM ISTमानसी देशपांडेच्या गुन्हेगारास जन्मठेप
औरंगाबादच्या बहुचर्चित मानसी देशपांडे बलात्कार आणि खून खटल्यात आरोपी जावेद खानला जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शहरातील अहिंसानगरमध्ये राहणाऱ्या मानसीचा खून जावेद खान उर्फ टिंगऱ्या या चोरानं केला.
Mar 22, 2012, 06:09 PM ISTमेक्सिकोमध्ये १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या
मेक्सिकोच्या दक्षिणी राज्यात गुआरेरोमध्ये १० लोकांच्या हत्येसंदर्भात तपास करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर काही शस्त्रधारी लोकांनी हल्ला चढवून १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली.
Mar 20, 2012, 01:11 PM ISTलादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी
अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.
Mar 19, 2012, 03:45 PM ISTस्त्री अर्भकाला फेकून देणाऱ्या वॉर्डबॉयला अटक
अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाला फेकून दिल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला अटक केली आहे. या रुग्णालयाच्या परिसरात एका स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याचे वृत्त झी २४ तासने चार दिवसांपूर्वी दाखवलं होतं.
Mar 14, 2012, 08:17 AM ISTरंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक
धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.
Mar 10, 2012, 03:33 PM ISTयवतमाळमधील वाहनचोर अटकेत
यवतमाळ पोलीस ठाण्यात दर दिवशी एक ना एक वाहनचोरीची तक्रार दाखल होत असे. कारण शहरात वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता. मात्र आता नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण ती अट्टल वाहनचोरांची पोलिसांनी गजाआड केली आहे.
Mar 7, 2012, 04:27 PM ISTवीट माफियांची वाढती दहशत
वाळूमाफियानंतर आता वीट माफियांची दहशत निर्माण झाली आहे. गौण खनिजाची रॉयल्टी मागण्यास गेलेल्या उस्मानाबादच्या तहसिलदारांना वीटभट्टी चालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
Mar 7, 2012, 03:31 PM ISTभेटायला आली सलमानला, भेटला मात्र भामटा
मुंबईच्या मायानगरीत स्वप्नपुर्तीसाठी लोक येतात खरं, पण त्यांची गाठ कोणाशी पडेल याचा काही नेम नसतो. नुकताच असा अनुभव मुंबईत आपल्या लाडक्या सलमान खानला भेटायला आलेल्या किशोरवयीन चाहतीला आला.
Mar 6, 2012, 08:21 AM ISTनागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध
नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.
Mar 3, 2012, 10:07 PM ISTनालासोपाऱ्यात गांजा विकणाऱ्यांस अटक
नालासोपाऱ्यातल्या संतोष भुवन परिसरातील एका ढाब्यात बुधवारी अमली पदार्थांची विक्री करण्यास आलेल्या दोन जणांना नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
Mar 3, 2012, 08:36 PM IST'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार
मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.
Mar 3, 2012, 08:23 PM IST'मंकी मॅन'च्या अफवेमुळे निष्पापांचे बळी
गेले काही दिवस मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ही मंकी मॅनची अफवा पसरलीय. मंकी मॅनच्या अफवेमुळं दोघांना आपला जीवही गमवावा लागलाय.
Mar 1, 2012, 04:37 PM IST