crime

गोरेगावात गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

मुंबईतल्या गोरेगावात एका गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. गोरेगावातल्या वनराई परिसरात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे.

Mar 1, 2012, 01:33 PM IST

संजय गुप्ताला 'हटके' प्रमोशन पडलं महागात

भलती कल्पकता ‘शूट आऊट अॅट वडाळा’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अंगाशी आली आहे. निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर केल्यानं संजय गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 1, 2012, 12:52 PM IST

सेक्स वर्करला नकाराचा अधिकार

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

Mar 1, 2012, 10:25 AM IST

ऑक्ट्रॉय चुकवणाऱ्या टोळीला अटक

दहिसर ऑक्ट्रॉय नाक्यावर बनावट पावत्या दाखवून वाहनं मुंबईत नेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ५४ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे.

Feb 28, 2012, 02:49 PM IST

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

Feb 28, 2012, 09:57 AM IST

अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

सातारा जिल्ह्यातली बापाने मुलीला मारल्याची घटना ताजी असतानाच नात्याला काळं फासणारी अशीच आणखी एक क्रूर घटना समोर आली आहे.

Feb 27, 2012, 03:07 PM IST

शिक्षक की गुन्हेगार?

कॉपी प्रकरणात शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास शिक्षकांचा विरोध होऊ लागला आहे. शिक्षकांवर कॉपी प्रकरणी फौजदारी कारवाई केल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

Feb 27, 2012, 01:47 PM IST

मुंबईच्या गर्दीत व्यापाऱ्यावर हल्ला

मुंबईतल्या सांताक्रुज परिसरात तीन गुंडांनी गर्दीत एका व्यापाऱ्यावर हल्ला करुन त्याला लुटलं. महावीर पारेख असं जखमी झालेल्या व्यापाऱ्याचं नावं आहे. त्याच्या दोन्ही पायावर चाकूनं वार करून त्याच्याकडचे लाखो रुपये आणि दागिने घेऊन हे चोरटे एका रिक्षातून पसार झाले.

Feb 27, 2012, 08:25 AM IST

बस ड्रायव्हरला मारहाण

बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.

Feb 27, 2012, 07:58 AM IST

बालकांची विक्री करणारी टोळी गजाआड

उल्हासनगरमध्ये नवजात मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. नवजात मुलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

Feb 24, 2012, 10:16 PM IST

विरारच्या शनी मंदिरात चोरी

विरारमधील गासकोपरी भागातील शनिमंदीर अनेकांचं श्रध्दास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही. त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरीच केली.त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Feb 23, 2012, 08:04 PM IST

पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर गोळीबार

पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर गोळीबार झाला आहे. शिवाजी कोर्ट परिसरात ही घटना घडली आहे. संदीप बांदल खून प्रकरणातल्या आरोपींनी हा गोळीबार केल्याचा संशय आहे.

Feb 23, 2012, 06:42 PM IST

पद्मश्री नवाब सैफ अलीला जामीन

अभिनेता सैफ अली खानला जामीन मंजूर झाला आहे. काही वेळापूर्वीच त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यासाठी सैफला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली असती.

Feb 22, 2012, 09:44 PM IST

नवाब सैफ अली खानला केले पोलिसांनी अटक !

अभिनेता सैफ अली खान थोड्याच वेळात कुलाबा पोलीस स्टेशनात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनिवासी भारतीय आणि साऊथ अफ्रिकेतील उच्चपदस्थ अधिकारी इकबाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खान याच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 22, 2012, 09:14 PM IST