crime

अनाथ मुलांवर लैंगिक अत्याचार

दिल्ली भागात असलेल्या आर्य अनाथालयात तब्बल आठ मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येताच दिल्ली परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिडीत मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

Feb 22, 2012, 05:20 PM IST

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक

बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.

Feb 21, 2012, 09:57 PM IST

माजी गृहराज्य मंत्र्यांचा मुलाला अटक

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांना पोलिसांनी अटक केलीय. बागवे हे उमेदवार होते तसंच त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.त्याच्याविरोधात खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज अविनाश बागवेंसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

Feb 21, 2012, 06:49 PM IST

गुन्हा केला राहुल गांधींनी?

यूपीमध्ये आचारसंहिता दरम्याना राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना युपीमध्ये वेग आला आहे.

Feb 21, 2012, 12:24 PM IST

केरळ गोळीबारात दोन मच्छीमार ठार

केरळच्या समुद्रात काल रात्री इटलीच्या एन्रिको लेक्सी या जहाजावरील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात, दोन भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.

Feb 16, 2012, 08:39 PM IST

सोशल मीडिया मुक्त - सिब्बल

इंटरनेट जगतातील सोशल मिडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.

Feb 15, 2012, 03:32 PM IST

बॉम्बस्फोटानं जग हादरलं

प्रथम जॉर्जियामध्ये बॉम्बस्फोट झाला, या घटनेला २४ तास उलटायच्या आत दिल्लीत इस्त्रायली दूतावासाच्या गाडीत स्फोट झाला आणि त्यानंतर आज थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झालेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Feb 14, 2012, 07:43 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : आरोपींना फाशी

२००३ मध्ये मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भातील तीन आरोपींना आज मुंबई हायकोर्ट मृत्यूदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Feb 10, 2012, 05:20 PM IST

आरोपींना पकडण्यात 'एनआयए' अपयशी

देशातल्या विविध बॉम्बस्फोटांमधले फरार आरोपींना पकडण्यात एनआयएला अपय़श आल्याचं समोर आलं आहे. या आरोपींना पकडण्यासाठी चक्क वृत्तपत्रात जाहिरात देण्याची नामुष्की एनआयएवर ओढवली आहे.

Feb 10, 2012, 02:44 PM IST

मुलाचा खून करून वडिलांची आत्महत्या

पिंपरी - देहूरोड परिसरातील साईनगर येथे मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघडकीस आली आहे. मात्र, कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Feb 10, 2012, 12:11 PM IST

आर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

Feb 10, 2012, 08:44 AM IST

नववीतल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला भोसकून मारले

नववीतल्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला भोसकून ठार मारल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथील एका शाळेत घडली. धडा शिकवत असतानाच विद्यार्थ्याने शिक्षिकेला भोसकलं.

Feb 9, 2012, 05:00 PM IST

जुहू कोळीवाड्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह

मुंबईत जुहू कोळीवाड्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास साधारण २२ वर्षांच्या या तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह मिळाला.

Feb 9, 2012, 01:19 PM IST

ड्रोन हल्ला: दहा दहशतवादी ठार

पाकिस्तान अफगाणिस्तानच्या मिरानशाह सीमेवर असलेल्या उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा संशयित दहशतवादी ठार झाले आहेत.

Feb 8, 2012, 03:13 PM IST

आईचीच मुलीला वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.

Feb 8, 2012, 08:08 AM IST