konkan

VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Mar 30, 2018, 04:37 PM IST

VIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'

'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.

Mar 30, 2018, 04:31 PM IST

ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  

Mar 15, 2018, 10:41 PM IST

कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ

 कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात 

Mar 1, 2018, 10:12 PM IST

मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक

रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.

Mar 1, 2018, 08:52 PM IST

कोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प, राज्याला मिळणार बळकटी

कोकण आणि विदर्भात आणखी एक मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळणार आहे.

Feb 21, 2018, 02:59 PM IST

कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण

कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Feb 21, 2018, 02:10 PM IST

रत्नागिरी | होळी | कोकणात शिमगोत्सवास सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 08:54 AM IST

मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा येथे तुरळक पावसाची शक्यता

अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावारण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र  कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Feb 8, 2018, 08:37 AM IST

नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी  उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.

Jan 19, 2018, 07:26 PM IST

नाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे

कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.

Jan 19, 2018, 04:10 PM IST

लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल

कोकणाच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोकणात पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. 

Dec 31, 2017, 02:41 PM IST

थर्टीफर्स्ट : कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम, अवजड वाहतुकीला बंदी

थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांचे हाल होतात. मागील अनुभव लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. 

Dec 27, 2017, 12:56 PM IST

सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती

  थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे. 

Dec 24, 2017, 12:18 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Dec 24, 2017, 11:48 AM IST