maharashtra corona

काल कोरोना पॉझिटिव्ह...आज निगेटीव्ह....कोरोना चाचणी किती खरी किती खोटी?

कोरोना रूग्णांची संख्या दररोज 30-40 हजाराच्या घरात येतेय. त्यामुळे राज्याची चिंता वाढलीय. पण कोरोना चाचणीच्या रिपोर्टवरून आता एक वेगळाच संभ्रम निर्माण झालाय. नाशिक शहरात एकाच रात्रीतून पॉझिटिव्ह रूग्णांचा निकाल निगेटिव्ह आलाय. 

Mar 30, 2021, 07:29 PM IST

Maharashtra Corona : देशात मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या (Maharashtra Corona) संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत. 

Mar 30, 2021, 05:47 PM IST

नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. 

Mar 27, 2021, 04:58 PM IST

महाराष्ट्रातून 'या' राज्यात जात असाल....तर आधी हे नियम पाहून घ्या!

महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्या (Maharashtra corona) आपल्या शेजारच्या राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. आणि त्यामुळेच इतर राज्यांसोबतच गुजरातनेही महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध कडक केले आहेत. (Corona test mandatory for traveling from Maharashtra to Gujrat)

Mar 27, 2021, 02:02 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा नव्या कोरोनाग्रस्तांचा रेकॉर्ड मोडला...पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. आज राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. 

Mar 26, 2021, 09:28 PM IST

Corona : होळी, ईद, ईस्टरच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या महत्वपूर्ण सूचना

महाराष्ट्रासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र सरकारनेही आता राज्यांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. एकीकडे देशभरात कोरोनाचा आलेख वाढतोय, तर दुसरीकडे अनेक सण-उत्सव तोंडावर आलेत. 

Mar 26, 2021, 08:38 PM IST

मोठा निर्णय : रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी!

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. कोरोनाचा धोका या पूर्वीपेक्षा जास्त वाढल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महत्त्वाच्या सेवांवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, काही ठिकाणी पेशंटसना बेड मिळणे देखील कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरणाच्या कामाला वेग देण्याचाही निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. 

२५ मार्च रोजी मुंबईतही दिवसभरात ५ हजाराच्या पुढे नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे, जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर अतिशय कडक अंमलबजावणीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल्स तसेच इतर हॉस्पिटल्समध्ये काही बेड शिल्लक आहेत, परिस्थिती विदारक होवू नये आणि हाताबाहेर जावू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Mar 26, 2021, 07:43 PM IST

नागपुरात आजवरची रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची संख्या....३५ रुग्णांचा मृत्यू

नागपुरात आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच ४ हजार कोरोनाबाधितांची (Nagpur Corona) भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात दररोज ३ हजाराहून नव्या रुग्णांची वाढ होत होती. आज तर त्याच्याही पुढे जाऊन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

Mar 26, 2021, 05:43 PM IST

महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, राज्यात बेड्सचा तुटवडा....ठाकरे सरकार काय करणार?

२०२० मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती अशी परिस्थिती आता उद्भवली आहे.

Mar 26, 2021, 04:45 PM IST

Maharashtra corona : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, पुन्हा नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक संख्या

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा (Maharashtra corona) विस्फोट झाला आहे. आज राज्यभरात 35 हजार 952 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आजवरचा हा सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आहे. चिंताजनक म्हणजे 111 रुग्णांचा कोरोनामुळे बळी (Maharashtra corona death) गेला आहे.

Mar 25, 2021, 08:58 PM IST

चिंताजनक!!! कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत देशातील टॉप १० जिल्ह्यांत ९ जिल्हे महाराष्ट्रातले

कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 

Mar 24, 2021, 05:55 PM IST

Lockdown : महाराष्ट्रातल्या 'या' १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागणार?

२०२० मधील देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. 

Mar 24, 2021, 02:56 PM IST

Maharashtra : खाजगी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती....पाहा राज्य सरकारचे नवे आदेश

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे. 

Mar 19, 2021, 05:23 PM IST
Maharashtra Corona Updates Last 24 Hours PT3M25S

VIDEO : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, एका आठवड्यात रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ

VIDEO : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, एका आठवड्यात रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Mar 15, 2021, 09:05 AM IST

महाराष्ट्राची चिंता वाढली....आज १० हजाराहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

पुण्यामध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या 

Mar 5, 2021, 08:50 PM IST