mahatma gandhi

लादेनने घेतली गांधीजींपासून एका गोष्टीची प्रेरणा

ओसामा बिन लादेनने आपल्या समर्थकांना महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला होता. ही बाब एक ऑडीओ टेपव्दारे स्पष्ट झाली आहे. परदेशी वस्तूंचा बहिष्कार करून गांधींजींनी इंग्रजांशी संघर्ष केला, त्याप्रमाणे अमेरिकन वस्तूंचा त्याग करा, असा सल्ला १९९३ मध्ये ओसामाने आपल्या साथीदारांना दिला होता.

Aug 18, 2015, 02:42 PM IST

गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी होणार सार्वजनिक.

केंद्रीय माहिती आयोगाने महात्मा गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी सार्वजनिक करण्याची सूचना केली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ओडिसामधील हेमंत पांडा यांनी गांधीजींच्या हत्येची प्राथमिक आरोपपत्रासह इतर माहिती मागितली होती. यात गांधीजींचे पोस्टमार्टेम झाले होते का असा प्रश्नही विचारण्यात आलाय. 

Jun 28, 2015, 08:28 PM IST

गोवा सरकारकडून गांधी जयंतीची सुट्टी रद्द

गोव्यातील भाजपा सरकारने महात्मा गांधी जंयतीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेऊन एका नव्या वादाला वाचा फो़डली आहे. यावरून काँग्रेसने गोव्यातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे.

Mar 15, 2015, 06:33 PM IST

महात्मा गांधी इंग्रजांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

राष्ट्रपिता महात्मा गांधी, हे ब्रिटीशांचे एजंट होते, असे धक्कादायक विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. त्यामुळे यावरुन मोठा काटजू यांनी ओढवून घेतलाय.

Mar 10, 2015, 04:26 PM IST

आज गांधी असते तर त्यांना धक्का बसला असता; ओबामांचं रिटर्न गिफ्ट...

दिल्ली निवडणुकांच्या तोंडावर भाजपला 'जोर का झटका' धीरे से लागलाय... तो देखील साता समुद्रापलिकडून... 

Feb 6, 2015, 12:25 PM IST

आकाशवाणीवर महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत मालिका

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष मालिका, आकाशवाणी सुरू करणार आहे.  ही एक संशोधनपर मालिका आहे. 

Jan 8, 2015, 05:08 PM IST

अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jan 4, 2015, 04:49 PM IST

नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी : भाजप खासदार

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यसभेत गदारोळ झाला. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी होते, असे खळबळजनक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे.

Dec 11, 2014, 03:57 PM IST

महात्मा गांधीच्या विचारांच्या विरुद्ध मोदींचे वर्तन - राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहे. त्यांचे वर्तन गांधींच्या विसंगत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  

Oct 12, 2014, 03:16 PM IST

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले. 

Oct 6, 2014, 03:37 PM IST