marathi news

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 18, 2023, 09:50 AM IST

उल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत तिघे ठार; आलिशान गाडीने रिक्षाचा केला चुराडा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Dec 18, 2023, 09:08 AM IST

Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!

Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

Dec 17, 2023, 07:34 PM IST

'माझ्या आजीपुढे रश्मिका मंदाना म्हणजे पाणी कम चाय'; गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता अशातच अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत वकील गुणरत्न सदावर्तेंबाबत एक विधान केलं आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Dec 17, 2023, 04:33 PM IST

उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

Sajjan Jindal : जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

Dec 17, 2023, 03:35 PM IST

'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

Dec 17, 2023, 02:46 PM IST

MPSC मध्ये नेहमीच अपयश; यश मिळवण्यासाठी तरुणाने प्यायले महिलेचे पाय धुतलेले पाणी

Pune Crime : पुण्यात भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाला नैराश्याला कंटाळून एका महिलेचा सल्ला घेणे चांगलेच महागात पडलं आहे. महिलेने साथीदारांच्या मदतीने तरुणाकडून दीड लाख रुपये लुबाडले आहेत.

Dec 17, 2023, 01:14 PM IST

'या घटनेमागेचा हेतू...'; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Parliament Security Breach : संसदेत 13 डिसेंबर झालेल्या काही तरूणांनी घुसखोरी करून गोंधळ निर्माण केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधानांनी विरोधकांनाही सल्ला दिला आहे.

Dec 17, 2023, 10:49 AM IST

'अशा मुली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी...'; प्रिया सिंगच्या दाव्यावर गायकवाड कुटुंबियांचा गंभीर आरोप

Thane Crime : फॅशन इन्फ्लुएंसर प्रिया सिंगवर तिच्या प्रियकराच्या मित्राने ठाण्यात हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. प्रियाचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याने प्रियाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आता गायकवाड कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 17, 2023, 09:47 AM IST

VIDEO: कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षकांसह कोसळली लोखंडी प्रेक्षक गॅलरी; अलिबागमध्ये मोठा अपघात

Alibag Accident News : अलिबागमध्ये कब्बडी सामना सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Dec 17, 2023, 08:59 AM IST

आयकॉनिक जर्सी, ज्या क्रिकेट-फुटबॉलमधून रिटायर्ड झाल्या

Iconic jersey: सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला, ज्याला हा सन्मान देण्यात आला. मास्टर ब्लास्टरने आपल्या शानदार करिअरमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती. भारतीय खेळाडू जर्सीवर 7 आणि 10 नंबर निवडू शकत नाहीत. महान डिएगो मारडोना श्रद्धांजली म्हणून इटालियन क्लब नेपोलीने जर्सी क्रं. 10   रिटायर्ड  केला. डच दिग्गज अजाक्सने 14 नंबर सोडला. जो जोहान क्रूफसाठी प्रतिष्ठीत होता. 

Dec 16, 2023, 02:24 PM IST

Garud Puran: नरकात शिक्षा कोणाला भोगावी लागते?

Garud Puran: देवी-देवता आणि आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना नरकात जागा मिळते असे म्हणतात. दारु, तामसिक भोजन, मांसाहार करणारे, क्रोधी, अहंकारी, असहाय्याला त्रास देणाऱ्यांना नरकात शिक्षा मिळते. या सर्वांना नरकात आपल्या पापाची शिक्षा मिळते, असे गरुड पुराणात म्हटले आहे.पापाचे भागीदार असलेल्यांनाही नरकात शिक्षा भोगावी लागते. नरकात जाण्यापासून वाचायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. एकादशीचे व्रत ठेवल्यास मेल्यानंतर स्वर्ग मिळतो, असे गरुड पुराणात म्हटले आहे.वाईट कर्म न केल्यास,पुण्याची कामे केल्यास,पित्रांनुसार श्राद्ध केल्यास स्वर्गात जागा मिळते. 

Dec 16, 2023, 01:05 PM IST

कोण खरं? कोण खोटं? भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान राडा

Yawatmal: आम्ही असली तृतीयपंथी आहोत आणि ते नकली तृतीयपंथीय असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले

Dec 16, 2023, 10:20 AM IST

नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.

Dec 16, 2023, 09:29 AM IST

आता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत

IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे

Dec 16, 2023, 08:56 AM IST