marathi news

38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक

NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.

Dec 10, 2023, 09:52 AM IST

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dec 10, 2023, 08:55 AM IST

धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.

Dec 10, 2023, 07:56 AM IST

आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो. 

Dec 10, 2023, 07:16 AM IST

नाशिक शहर स्फोटाने हादरले, ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये ब्लास्ट

Nashik Blast:  नाशिक शहर स्फोटाने हादरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला आहे. 

Dec 9, 2023, 06:28 PM IST

'कासवां'मुळे ओडिशात क्षेपणास्त्र चाचणीला ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारताची प्रमुख लष्करी संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार नाही. इतका मोठा निर्णय घेण्यामागचे कारण आहे कासव.

Dec 9, 2023, 05:40 PM IST

आकर्षक महिलांमध्ये असतात 'हे' 9 गुण

Habits of Attractive Women: नेहमी आनंदी राहणाऱ्या महिला सर्वांना प्रिय असतात. त्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात.
ईमानदार असलेल्या महिला प्रत्येकाला आवडतात. नेहमी स्वच्छ, टापटीप राहणाऱ्या महिला आपल्या प्रभाव इतरांवर पाडतात. आकर्षक, प्रभावी महिलांना सतत काही ना काही कामात व्यस्त राहायला आवडते. 

Dec 9, 2023, 05:12 PM IST

24 व्या वर्षी डॉक्टर तरुणी झाली गावची सरपंच; गावकऱ्यांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय

Beed News : बीडमध्ये एका 24 वर्षीय डॉक्टर तरुणीने सरपंचपदी बसण्याचा मान मिळवला आहे. या तरुणीने तिच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील लोकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Dec 9, 2023, 05:00 PM IST

'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष

Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Dec 9, 2023, 04:36 PM IST

'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

‎Shaley Poshan Aahar Yojana : राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षण विभागाने पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने विरोध केला आहे.

Dec 9, 2023, 04:03 PM IST

पदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

CIDCO Recruitment: लेखा लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एस-8 नुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Dec 9, 2023, 03:31 PM IST

'उद्योगमंत्री असून साधे रोजगार मेळावे घेत नाहीत'; उदय सामंतांवर संतापले शिवसैनिक

Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री असून जिल्ह्यात रोजगार मेळावा घेत नाही असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Dec 9, 2023, 03:04 PM IST

मागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप...धक्कादायक व्हिडीओ

Bihar News:  परीक्षा केंद्राच्याबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होती. असे असतनाही आरोपीने राहुलच्या शरीरात चाकू खुपसणे सुरुच ठेवले. 

Dec 9, 2023, 02:56 PM IST

नवीन आणि विराटच्या भांडणात उडी का घेतली? गंभीर म्हणाला, 'कोणी पण येऊन माझ्या...'

Gautam Gambhir vs Virat Kohli : गेल्या वर्षी आयपीएलच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार वाद झाला होता. मात्र यामध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.

Dec 9, 2023, 02:19 PM IST

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता...

Zerodha Success Story : झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी मिळून 2010 मध्ये ही कंपनी सुरू केली. दोन्ही भावांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणताही निधी घेतला नाही. मात्र आता दोघेही दिवसाला 53 लाख रुपये कमावत आहेत.

Dec 9, 2023, 01:41 PM IST