marathi news

'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ

एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. 

Aug 18, 2023, 03:55 PM IST

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Aug 18, 2023, 03:21 PM IST

महाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत अखेर महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. यासोबतच गौरी, गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा नागरिकांना देण्यात येणार आहे.

Aug 18, 2023, 02:19 PM IST

मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 18, 2023, 01:53 PM IST

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात

MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aug 18, 2023, 01:50 PM IST

रिस्पेक्ट! अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून तैनात असलेल्या संदीप वाकचौरे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

Aug 18, 2023, 01:26 PM IST

तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व

RBI UDGAM Portal: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस माहिती) लाँच केले. यामुळे ग्राहकांना अनेक बँकांमध्ये जमा केलेली दावा न केलेली रक्कम एकाच ठिकाणी शोधणे सोपे होणार आहे.

Aug 18, 2023, 01:11 PM IST

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

Aug 18, 2023, 12:04 PM IST

Video : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Aug 18, 2023, 12:02 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Aug 18, 2023, 11:18 AM IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 09:47 AM IST

लवकरच मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, सरकारची मोठी तयारी; जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price : देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या महागाईतूनही दिलासा मिळू शकतो. भारत सरकार यावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारीही या योजनेवर काम करत आहेत.

Aug 18, 2023, 08:45 AM IST

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

Crime News : कोची पोलिसांनी महिलेची वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाला अटक केली आहे. आरोपी 23 वर्षीय तरुण बुरखा घालून मॉलमध्ये शिरला होता आणि मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ शूट करत होता.

Aug 18, 2023, 07:45 AM IST

गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं. 

 

Aug 18, 2023, 07:42 AM IST

MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी

MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Aug 17, 2023, 06:56 PM IST