marathwada

राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jul 17, 2014, 06:59 PM IST

मुंबईसह उपनगरात चांगला पाऊस

 मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस असल्याने हवेत चांगला गारवा आहे. तर आतापर्यंत मराठवाड्यावर रुसलेल्या पावसानं उशीरा का होईना हजेरी लावलीय. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात सगळीकडेच पावसानं गेल्या दोन दिवसांत हजेरी लावलीय.

Jul 10, 2014, 09:50 AM IST

मुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस

आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.

Jul 9, 2014, 07:56 AM IST

मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

Jul 8, 2014, 05:26 PM IST

बीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार

बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.

Jun 12, 2014, 01:24 PM IST

मुंबई, ठाण्यासह, खानदेश, कोकण, मराठवाड्यात आज मतदान

राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.

Apr 24, 2014, 07:13 AM IST

लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

Apr 17, 2014, 12:23 PM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

Mar 12, 2014, 07:15 PM IST

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

Mar 12, 2014, 03:47 PM IST

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

Mar 10, 2014, 09:23 PM IST

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

Mar 10, 2014, 08:23 PM IST

मराठवाडा, विदर्भ वेगळी राज्य करा - पासवान

लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.

Feb 21, 2014, 03:32 PM IST