marathwada

विधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत

मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.

Dec 19, 2013, 11:22 PM IST

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

Dec 5, 2013, 10:12 AM IST

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2013, 06:01 PM IST

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

Sep 30, 2013, 06:28 PM IST

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

Jul 24, 2013, 10:24 AM IST

राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Jul 3, 2013, 08:54 PM IST

अशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?

आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.

Jun 17, 2013, 05:46 PM IST

राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

May 28, 2013, 12:56 PM IST

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

May 5, 2013, 10:05 PM IST

पाणी आलं आणि ते नाच नाच नाचले...

आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.

Apr 29, 2013, 08:36 AM IST

स्त्री अभ्यास केंद्र : डेटा एन्ट्री ऑपरेटर-अटेंडेट भरती

यु.जी.सीच्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाच्या ठराविक कालावधीसाठीची पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अटेंडेट या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Apr 3, 2013, 11:37 AM IST

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

Jan 28, 2013, 03:03 PM IST

१० महिन्यात १५२ शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Nov 27, 2012, 07:53 PM IST

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

Nov 5, 2012, 08:24 PM IST

पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.

Nov 3, 2012, 01:39 PM IST