आज म्हाडाची लॉटरी होणार जाहीर...
Jun 25, 2014, 09:53 AM ISTमुंबईकरांनो, आज म्हाडाची लॉटरी
मुंबईकरांचं स्वस्त घराचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. मुंबई आणि कोकण येथील 2 हजार 641 घरांसाठी आज दुपारी 10 वाजता म्हाडाची लॉटरी लागणार आहे.
Jun 25, 2014, 09:24 AM ISTपाहाः म्हाडाच्या लॉटरीची पात्रता यादी
म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून राहिलेल्या मुंबईकर आणि कोकणवासियांना आपले नाव लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Jun 20, 2014, 06:56 PM ISTम्हाडाच्या कर्मचाऱ्यांना तारखांचा पडला विसर अन्...
‘म्हाडा’नं आपल्या सोडतीसाठी आणि अर्ज भरण्यासाठीची तारीख वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिला होता. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ज्या अर्जदारांनी म्हाडाची वेबसाईट उघडली... त्यांच्या पदरात मात्र निराशाच पडली.
May 31, 2014, 05:45 PM ISTगूड न्यूज.. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार
मुंबईकरांसाठी आता एक गूड न्यूज.. म्हाडानं घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.
May 28, 2014, 06:55 PM ISTम्हाडाचे ऑनलाईन अर्ज आजपासून!
निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली म्हाडा सोडतीतील ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होतेय.
May 6, 2014, 10:24 AM ISTम्हाडाचे ऑनलाईन अर्ज सहा मेपासून उपलब्ध
`म्हाडा`ची 2014 घरांची सोडत आता 15 जून रोजी होणार आहे. तर सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे.
Apr 26, 2014, 12:02 PM ISTआजपासून 2641 घरांसाठी म्हाडाची नोंदणी सुरू
म्हाडाच्या मुंबई आणि विरारमधील 2641 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु होतेय. दुपारी 2 वाजल्यापासून ही नोंदणी सुरु होणार आहे. या नोंदणीनंतरच पुढे घरासाठी अर्ज करता येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे संध्याकाळी सहापर्यंत ही नोंदणी इच्छुकांना करता येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलपासून अर्ज विक्री करण्यात येईल. 24 एप्रिल ते 16 मेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
Apr 15, 2014, 03:22 PM ISTम्हाडाचं घरं... अन् हेलपाटे घालून मर!
म्हाडानं घरांसाठी नवीन जाहिरात दिलीय. पण, म्हाडाचं घर घेणं म्हणजे काय दिव्य असतं, ते अनुभवायचं असेल तर मालाड मालवणी भागातील म्हाडा कॉलनीला भेट द्यायलाच हवी.
Mar 2, 2014, 11:36 AM ISTपाहा, म्हाडाची ही घरं तुमच्यासाठी आहेत?
म्हाडानं यंदा आपल्या घरांच्या किंमतीत रेकॉर्ड करण्याचं ठरवलेलं दिसतंय. येत्या दोन दिवसांत म्हडाच्या तब्बल ८७८ घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे.
Feb 21, 2014, 09:47 AM IST`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?
पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.
Feb 15, 2014, 06:09 PM ISTएक्सक्लुझिव्ह : म्हाडाच्या तयार इमारती गर्दुल्यांसाठी?
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षे नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम म्हाडा करतंय. गेल्या आठ वर्षांपासून सायनच्या प्रतिक्षानगरात ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग बांधून तयार आहे. परंतु करोडो रूपये खर्च करून बांधलेली ही इमारत ओस पडून आहे.
Oct 28, 2013, 08:01 PM IST...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’
म्हाडाने लॉटरीसाठीच्या उत्पन गटाच्या निकषांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे सहज शक्य होणार असल्याचा दावा म्हाडाने केलाय.
Oct 24, 2013, 10:49 PM IST`झी मीडिया`चा दणका : `ट्रान्झिट कॅम्प`च्या छळछावण्यांमधून सुटका
मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.
Oct 2, 2013, 01:16 PM ISTझी मीडियाचा दणका: ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना मिळाला न्याय
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला.
Oct 1, 2013, 05:44 PM IST