mp

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Aug 9, 2014, 03:03 PM IST

मोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे. 

Aug 6, 2014, 07:28 PM IST

हायटेक मोदींचे खासदार आता ‘व्हॉटसअप’वर!

संसद अधिवेशनातील भाजप खासदारांची कामगिरी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतापलेत. बैठकांना दांडी मारणाऱ्या खासदारांना वठणीवर आणण्यासाठी मोदींनी एक शक्कल लढवलीय.

Jul 30, 2014, 11:36 PM IST

बेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले

सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली. 

Jul 30, 2014, 09:41 PM IST

सेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jul 23, 2014, 12:20 PM IST

व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात!

पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

Jul 22, 2014, 09:11 PM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST

शिवसेना खासदारांचं महाराष्ट्र सदनात आंदोलन

(रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं. 

Jul 17, 2014, 06:18 PM IST

'भाजप खासदारांवरील टीएमसीचे आरोप चुकीचे'-पाल

खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत लज्जास्पद वर्तन करत संसदेची शोभा केलीय. महागाईवर चर्चा सुरू असताना भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली. 

Jul 8, 2014, 11:22 PM IST

मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

Jul 8, 2014, 05:26 PM IST

सेनेचे खासदार भराडी देवीच्या दर्शनाला...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत....

May 25, 2014, 11:16 AM IST

अमेरिकेचे खासदारही करतात मोदींची प्रशंसा

अमेरिकेच्या एका खासदारांनी नरेंद्र मोदींना दूरदृष्टीचे राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्याच प्रमाणे मोदी हे भारतात एका नव्या युगाची सुरूवात करतील, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. या कारणाने मोदींची आता अमेरिकेत ही स्तुती होऊ लागली आहे

May 21, 2014, 02:39 PM IST