ms dhoni

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

विराटनं सुरा काढला आणि शिखरला खुपसला - धोनी

ब्रिस्बेन टेस्टनंतर क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रुममधल्या वातावरणात तणाव असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलं ते महेंद्र सिंग धोनीनंच... पण, आज मात्र या भारतीय कॅप्टननं सगळ्याच गोष्टी मजेशीर अंदाजात उडवून लावल्या... आपल्याला वाट्टेल तशा स्टोरिज बनवणाऱ्या आणि मीडियाला देणाऱ्या खेळाडुंनाही त्यानं आपल्याच अंदाजात फैलावर घेतलं. 

Dec 25, 2014, 03:43 PM IST

आलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको

क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.

Dec 15, 2014, 03:17 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे. 

Nov 10, 2014, 04:35 PM IST

दुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय

 भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा वन डे सामना आज दिल्ली येथे रंगतो आहे.

Oct 11, 2014, 02:14 PM IST

पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

Oct 9, 2014, 07:11 AM IST

भारत वि. वेस्ट इंडिज - पहिली वन डे

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान पहिला वन डे सामना आज कोची येथे रंगतो आहे

Oct 8, 2014, 02:15 PM IST

आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे, मॅच धोक्यात

कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Oct 8, 2014, 12:52 PM IST

कोलकाता नाइट रायडर्स विजयी

आयसीएल टी २० स्पर्धेतील आज ओपनिंग सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगतो आहे. 

Sep 17, 2014, 09:38 PM IST

पराभवाला मीच जबाबदार - महेंद्रसिंग धोनी

इंग्लड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्या अवघ्या तीन रन्सने पराभवाची जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्वीकारली आहे. भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान एकमेव टी-२० सामना खेळविण्यात आला. 

Sep 8, 2014, 07:27 PM IST

'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Sep 2, 2014, 09:35 PM IST

भारत वि. इंग्लंड पहिली वन डे पावसामुळे रद्द

भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे. 

Aug 25, 2014, 03:34 PM IST

कोच आहेत टीमचे बॉस, धोनीकडून फ्लेचर यांची स्तुती

इंग्लंडमध्ये वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं कोच डंकन फ्लेचर यांची स्तुती केलीय. धोनीनं म्हटलं की, फ्लेचरच टीमचे बॉस आहेत आणि ते 2015 वर्ल्डकपपर्यंत टीमचे बॉसच असतील. 

Aug 25, 2014, 07:22 AM IST

माजी खेळाडूंकडून कोच फ्लेचर टार्गेट, धोनीवर प्रश्नचिन्ह

मुंबईः इंग्लड विरुद्ध ओव्हलमध्ये पाचव्या आणि अंतिम टेस्टमध्ये भारताचा डाव आणि २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी कोच डंकन फ्लेचरला हटविण्याची मागणी केली आहे. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर फ्लेचरच्या भूमिकेवर टीका करताना त्यांचे योगदान शून्य होते त्यांना हटविण्याची वेळ आल्याचेही म्हटले आहे. 

Aug 18, 2014, 07:41 PM IST

धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

Aug 18, 2014, 01:12 PM IST