mumbai university

मुंबई विद्यापीठात 'कुंपणच शेत खातय'

मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीत कुंपणानेच शेत खाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपर फोडण्यात दोन प्राध्यापक, पाच शिपाई, दोन लॅब असिस्टंट आणि पाच विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

Jun 6, 2012, 08:29 AM IST

मुंबई विद्यापीठाचा पुन्हा एकदा गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची मालिका सुरूच आहे. गुरूवारी इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला. गुरूवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर भाग दोन या विषचाया पेपर असताना विद्यार्थ्यांना मात्र भाग एकचा पेपर देण्यात आला.

May 18, 2012, 08:14 AM IST

विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत आज पुन्हा गोंधळ झाला. बीएंमएस विषयाचा पेपर काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पोहोचलाय. इंटरनॅशनल फायनान्स या विषयाची परीक्षा होती. तीन वाजता हा पेपर सुरू होणार होता. मात्र काही परीक्षा केंद्रांवर तब्बल तासभर पेपर उशीरा सुरू झाला.

Apr 25, 2012, 09:48 PM IST

मुंबई विद्यापीठ घेणार फेरपरीक्षा

कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला होता. पेपरसाठी वेळेत काहींना जाता आले नव्हते तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठ फेर परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Apr 19, 2012, 02:22 PM IST

शिक्षणाचा खेळखंडोबा आणि राजकीय आखाडा

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि सा-याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झालीय.. खरतर यानिमित्तानं सुरु असलेली कुलगुरु हटाव मोहीम जरा वेगातच झाली.. पण कुलगुरु हटाव मोहीमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचा खेळ जास्त आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे साडेसहाशे महाविद्यालये येतात. आणि या विद्यापीठाअंतर्गत साडेसहा लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.. आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती ख-या सक्षम प्रशासकीय धोरणाची.

Apr 5, 2012, 11:03 PM IST

युवासेनेचे सिनेट सदस्य निलंबित

मुंबई युवासेनेचे आठ सिनेट सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी ही कारवाई केली आहे.

Mar 29, 2012, 01:40 PM IST

टी.वाय., बी.कॉमचे प्रवेशपत्र ऑनलाईन

मुंबई विद्यापीठाने आखणी एक पाऊल पुढे टाकत परीक्षाचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. वाय. बी.कॉमच्या परीक्षा २१ मार्चपासून सुरु होत आहेत. त्यांना याचा लाभ होणार आहे. या ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.

Mar 19, 2012, 12:05 PM IST

मुंबईतील कॉलेज घालणार ‘आकाश’ला गवसणी

जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट पीस असणाऱ्या ‘आकाश’ला मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Feb 8, 2012, 01:56 PM IST

विकिपिडिया कॉन्फरन्समध्ये भाजयुमोचा राडा

मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या विकिपिडियाच्या कॉन्फरेंसमध्ये भाजयुमोचे जोरदार आंदोलन, विकिपिडियाच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्यात आला आहे. भारताच्या नकाशामध्ये अरूणाचल प्रदेश हा भाग चीनमध्ये दाखविण्यात आला आहे.

Nov 18, 2011, 07:51 AM IST

उत्तम केंद्रे टॉयलेटमध्ये, युवासेनेचा गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभारामुळे तिरंदाजीच्या खेळाडूंना चक्क राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेलाच मुकावं लागलं. याचा निषेध करत युवा सेनेनं विद्यापीठात गोंधळ घातला आणि क्रीडा विभागाचे संचालक उत्तम केंद्रे यांना टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं.

Nov 11, 2011, 03:15 PM IST