not happy

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

Dec 31, 2017, 03:34 PM IST

महबूबा मुफ्तींच्या कार्यशैलीवर केंद्र सरकार नाराज

केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महबूबा मुफ्ती जवानांचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्या प्रभावीपणे काम करत नसल्यानेही केंद्र सरकार नाराज आहे.

Apr 17, 2017, 04:36 PM IST

धोनीची आधारवरची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षी नाराज

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आधार माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने धोनीच्या पत्नी यामुळे नाराज झाली आहे. धोनीची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षीने केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ट्विट करत नाराजी दर्शवली आहे.

Mar 29, 2017, 12:38 PM IST

शिवसेनेत स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी

उमेदवारी यादी जाहीर होऊ लागताच शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं समोर येतंय. प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. किशोरी पेडणेकर यांचा आधीचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांना या नव्या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Feb 2, 2017, 02:21 PM IST

नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी

नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

Dec 21, 2016, 05:16 PM IST

विराटच्या कृतीवर सुनील गावस्कर नाराज

भारतीय संघाने चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने सामना जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणि संपूर्ण संघाने विजय सेलिब्रेट केला. पण आक्रमकतेमुळे ओळखला जाणारा विराट कोहली आज पुन्हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी बनला. कसोटीच्या दुसऱया दिवशी बेन स्टोक्स आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करतांना कोहलीने टीप्पणी केली. विराटच्या या कृतीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.

Nov 29, 2016, 06:34 PM IST

या अभिनेत्रीने म्हटलं की ती आता पोर्न सिनेमामध्ये काम करेल

राखी सावंतचा लीड रोल असणाऱ्या एक कहानी जूली या सिनेमावर सेंसर बोर्डाने अनेक कट सूचवले आहेत. यामुळे राखी सावंत नाराज झाली आहे. एक मीडिया इंटरव्यूमध्ये बोलतांना राखी बोलली की, ती आता पॉर्न सिनेमांमध्ये काम करणार आहे... राखी सावंत यामुळे भलतीच नाराज झाली आहे.

Sep 3, 2016, 08:52 PM IST

डॉ. दीपक सावंतांचं पद काढून घेण्याची शिवसैनिकांची मागणी

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Aug 20, 2016, 10:38 AM IST

शिवसेना सत्ता सोडून दाखवणार ?

सरकारच्या कारभाराबाबत शिवसेना आमदारांमध्ये असलेल्या नाराजीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काल पक्षप्रतोद आणि मंत्र्यांची एकत्रित बैठक घेतली. पक्षप्रमुख पुढल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, या एकाच नोटवर ही बैठक संपल्याचं सांगितलं जात असलं तरी शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडावं, असा सूरही उमटल्याचं समजतंय.

Jul 26, 2016, 09:27 AM IST

भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज

आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'

Jun 2, 2016, 05:26 PM IST