पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातही गोंधळ
पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.
Apr 17, 2014, 02:03 PM ISTसिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे
कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.
Apr 16, 2014, 09:17 AM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM ISTअजित पवार भडकलेत, राणेंबाबत भूमिकेवर दमबाजी
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.
Apr 11, 2014, 05:36 PM IST`राजीनामे देऊ पण राणेंचा प्रचार करणार नाही`
सिंधुदुर्गात काँग्रेस-राष्ट्रवादी वाद चिघळल्याचं दिसतंय. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांकडून येत असलेला दबाव धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेच सादर केलेत.
Apr 9, 2014, 01:45 PM ISTकार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत
सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.
Apr 1, 2014, 09:38 AM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणेंविरोधात राष्ट्रवादीचे बंड
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सिंधुदुर्गातला संघर्ष वाढला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे यांनी गेली साडे चार वर्षे राष्ट्रवादीला त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यात या दोन पक्षाची आघाडी झाली असली तरी आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला मदत करणार नाहीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतली आहे.
Mar 7, 2014, 09:00 AM IST`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा
‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..
Feb 14, 2014, 01:00 PM ISTथर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी
थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.
Dec 26, 2013, 11:17 AM ISTकोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा
कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.
Dec 6, 2013, 04:33 PM ISTनारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद
कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.
Dec 5, 2013, 07:00 PM ISTराणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!
कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.
Dec 4, 2013, 07:26 PM IST... आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर
सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान - प्रतिआव्हान दिलंय.
Nov 26, 2013, 06:16 PM ISTपोलिसांनी सुपारी घेऊन केला शिवसैनिकांवर हल्ला - उद्धव
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी कणकवलीत शिवसैनिकांशी संवाद साधला.
Nov 26, 2013, 03:37 PM ISTसिंधुदुर्गात काँग्रेस – शिवसेनेत राडा! पोलिसांवरही दगडफेक
सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या आमने-सामने या कार्यक्रमात राडा झालाय.
Nov 24, 2013, 09:36 PM IST