solapur

रिकाम्या बाटल्यांचा असाही वापर...

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनचा नवीन प्रयोग केलाय. विशेष म्हणजे सहाशे रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन ही ठिबक यंत्रणा तयार केली गेलीय. या कल्पकतेमुळे ३६० निंबोणीची झाडं दुष्काळातही हिरवीगार राहिलीयेत.

Sep 7, 2012, 09:17 AM IST

सीमेवर राजरोसपणे होतोय देहव्यापार

सोलापूरमध्ये एका जंगलात मुलींची विक्री सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून हा डाव हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी नऊ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

Jul 24, 2012, 08:15 AM IST

पावसासाठी... बेडकाचं अन् गाढवाचं लग्न

राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.

Jul 13, 2012, 04:21 PM IST

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...

शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.

Jun 30, 2012, 11:03 AM IST

सोलापुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडीतल्या के.एन.भिसे ज्युनिअर कॉलेजमधल्या अकरावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षक आणि कॉलेजच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहेत.

Jun 14, 2012, 12:26 PM IST

‘झी 24तास’चा दणका; ‘कुष्ठधाम’चा कायापालट

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील केडगावच्या ‘कुष्ठधाम’ या सरकारी भिक्षेकरी गृहातील छळछावणीचा ‘झी 24 तास’नं पर्दाफाश केला होता. यानंतर एका दिवसात कुष्ठधामचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा प्रशासनानं या बातमीची गंभीर दखल घेतलीय.

Jun 12, 2012, 11:32 AM IST

दुष्काळात नेत्यांचा भार...

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळाचं दुष्टचक्र सुरूच आहे. आणि त्यातच इथले लोकप्रतिनिधीही स्वत:चीच तुमडी भरत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि गावकरी मात्र उपाशी असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

Jun 3, 2012, 01:19 PM IST

सोलापुरातही स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघड

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरात मध्यरात्री एक स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलंय. त्यामुळे सोलापुरातही खळबळ उडालीय.

Jun 3, 2012, 12:48 PM IST

कथा..सोलापुरातील अदृश्य किल्ल्याची

कथा आहे, सोलापूरमधील एका अदृश्य किल्ल्याची. शनिवारवाड्यापेक्षा मजबूत असणारा किल्ला अचानक दिसू लागलाय. तो चक्क पाण्यात. झी 24 तासनं सातशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा दिला.

Jun 1, 2012, 11:02 AM IST

सीना कोळेगाव धऱणाचे पाणी कोणाला?

सीना कोळेगाव धऱणाचं पाणी अन्य भागांना सोडू नये असे आदेश गुरुवारी हायकोर्टानंही दिलेत.उस्माबादमधल्या शेतक-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा आदेश दिला.

Jun 1, 2012, 10:15 AM IST

सोलापूरला पाणी सोडणे महाग

सीना कोळेगाव धरणातचं पाणी सोलापूरला सोडल्यानंतरही पाण्याचा वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

May 30, 2012, 03:41 PM IST

शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडायला उस्मानाबादकरांनी विरोध केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार दिलीप मानेंनी केलेल्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी सोडण्यासाठी आलेल्या अभियंत्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले

May 9, 2012, 02:00 PM IST

शहराचा विकास कसा करायचा?- महापौर

सोलापूर शहराचा विकास कसा होणार हा प्रश्न पडलाय खुद्द नवनिर्वाचीत महापौर अलका राठोड यांना. सोलापूर प्रशासनाकडून अवहेलना होत असल्याचं तसचं प्रशासन विकास कार्यात सहकार्य करत नसल्याचं म्हणण आहे महापौर अलका राठोड यांचं.

May 9, 2012, 09:18 AM IST

मंदार परब यांच्या हस्ते लोकमंगल पुरस्कार

सोलापूरमधील लोकमंगल प्रतिष्ठान आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या लोकमंगल जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण आज करण्यात आलं. झी चोवीस तासचे संपादक मंदार परब यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

Jan 9, 2012, 01:04 PM IST

बार्शीत मतदानाला गर्दी

सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.

Dec 11, 2011, 07:42 AM IST