राहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
Apr 21, 2014, 09:29 PM IST`उद्धट` लोकांसाठी मी ही उद्धट, उद्धव ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर
मुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.
Apr 21, 2014, 09:11 PM ISTअजित दादांचं मुंडेंना प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंना सल्ला!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.
Apr 20, 2014, 06:04 PM ISTकोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने
आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.
Apr 13, 2014, 08:40 AM ISTसामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते
Mar 30, 2014, 09:14 AM ISTशिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार
ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.
Mar 27, 2014, 07:16 PM ISTशरद पवारांची सेना नेतृत्वावर टीका
ज्या लोकांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिर्डी मधील सेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप सेनेवर टीका केलीये.
Mar 23, 2014, 08:51 AM ISTशिवसेनेत लाचारी, अजित पवारांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीये. साहेबांना निवडणुकीला उभं राहण्याचं आवाहन देण्यापेक्षा स्वतः उभं राहून दाखवावं, असं ते म्हणालेत.
Feb 7, 2014, 08:26 AM ISTशरद पवारांची सोबत अ...ह... `असंगाशी संग नको`!
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. `असंगाशी संग नको` या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडलीय.
Feb 1, 2014, 12:21 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर
बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आलाय. बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय.
Jan 20, 2014, 11:56 AM ISTनाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
Dec 30, 2013, 08:16 PM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM ISTजाणार मोहन ‘मनसे’कडेच!
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर `चालला मोहन कुणीकडे?` अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं आता मोहन रावले मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 3, 2013, 08:47 PM IST‘न’- नार्वेकरांचा, ‘न’- नाराजीचा आणि ‘न’- शिवसेनेतल्या नाट्याचा
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी ज्यांच्यावर तोफ डागली ते उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण... असा प्रश्न अनेकांना पडला असेल... त्यांच्यासाठी खास..
Dec 2, 2013, 09:11 PM ISTशिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जातंय?
शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...
Nov 23, 2013, 08:19 AM IST