www.24taas.com, झी मीडिया, गेवराई, बीड
ज्या लोकांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिर्डी मधील सेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप सेनेवर टीका केलीये.
गेवराई इथं राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला, पवार यांनी यावेळी शिर्डीचे सेना उमेदवार घोलप यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल सेना नेतृत्वावर टीका केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.