फेसबुकवर ही ५ कामं करता? तर मग व्हा सावध, अन्यथा अकाऊंट होईल बंद

तुम्हीही फेसबुक वापरता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 12, 2018, 09:38 PM IST
फेसबुकवर ही ५ कामं करता? तर मग व्हा सावध, अन्यथा अकाऊंट होईल बंद title=

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. आपल्यापैकी अनेकांचं फेसबुक शिवाय पानही हलत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्हीही फेसबुक वापरता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

फेसबुक युजर्सची संख्या २ अरबपेक्षाही ज्यास्त आहे. आपण जवळपास दररोज फेसबुक पोस्ट करत असतो. इतरांच्या पोस्टवर कमेंट करत असतो, पोक करतो आणि त्यासोबतच ग्रुप्सही जॉईन करतो. मात्र, तुमच्या एका चुकीमुळे तुमचं फेसबुक अकाऊंट बंद होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात सांगणार आहोत.

ग्रुप्स जॉईन करणं

फेसबुकवर अकाऊंट झाल्यानंतर आपण अनेक ग्रुप्स जॉईन करतो मात्र, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की २०० हून अधिक फेसबुक ग्रुप्स जॉईन केल्यावर अकाऊंट बंद होऊ शकतं.

पोक करणं

सामान्यत: आपण आपल्या मित्रांना आठवण करुन देण्यासाठी त्यांना पोक करत असतो. मात्र, जास्त लोकांना पोक केल्यास तुमचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं.

आक्षेपार्ह मजकूर

अनेक फेसबुक युजर्स पोस्टवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करतात किंवा पोस्ट करतात. पण आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्यास किंवा शेअर केल्यास तुमचं अकाऊंट ब्लॉक केलं जावू शकतं.

Image result for facebook account zee news

अवैध मजकूर

एखाद्या व्यक्तीचा अपमान होईल असं मजकूर फेसबुकवर चुकूनही पोस्ट करु नका. त्यासोबतच असा मजकूर असलेल्या पोस्टला तुम्हाला टॅग केलं असेल तर तुमच्या टाईमलाईन ते येऊ देवू नका.

Image result for facebook account zee news

चुकीचा पासवर्ड

सलग चुकीचा पासवर्ड टाकल्यानेही तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या फेसबुकचा पासवर्ड नेहमीच लक्षात ठेवा.