लंडन : फेसबुकने एका तंत्रज्ञानाच्या पेटेंटचे आवेदन दाखल केले आहे. जे युजर्सच्या सामाजिक-आर्थिक स्तराची स्वतः पारख करेल. त्याचबरोबर त्याची वेगवेगळ्या स्तरात विभागणी करेल.
ते वर्ग असे असतील- कामगार वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्चस्तरीय वर्ग.
डेलीमेल रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे की, पेटेंटनुसार, सोशल मीडिया दिग्गज एक अशी प्रणाली विकसित करत आहे ज्यामुळे युजर्सचे खाजगी आकडे एकत्र करुन त्याचे विश्लेषण करुन त्यांची सामाजिक-आर्थिक स्तराचा अंदाज ठरवण्यात येईल. यात आकड्यात शिक्षण, घराची मालकी आणि इंटरनेटचा वापर याचा समावेश असेल.
हे पेटेंट शुक्रवारी सार्वजनिक केले गेले. यात असलेल्या अल्गोरिदममुळे फेसबुकच्या क्षमतांमध्ये सुधारणा होईल. यामुळे फेसबुक युजर्सना अधिक संबंधित जाहिराती दाखवू शकेल.पेटेंटमध्ये सांगितले आहे की, आपल्या युजर्सचा सामाजिक-आर्थिक स्तराचा अंदाज लावताना फेसबुक थर्ड पार्टीच्या जाहिराती संबंधित युजर्संना पाठवण्यात मदत करेल.