नवी दिल्ली : तुम्ही मोबाईल फोन घेण्याच्या तयारीत आहात तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे.
Honor कंपनीने बुधवारी आपल्या Honor 8 Lite या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.
Honor 8 Lite हा स्मार्टफोन मे महिन्यात लॉन्च केला होता. फोन लॉन्च केला त्यावेळी याची किंमत 17,999 रुपये होती.
आता फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने याची किंमत 15,999 रुपये होती. ग्राहकांना हा फोन ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन रंगात उपलब्ध आहे.
Honor 8 Lite हा स्मार्टफोन Honor P8 Lite (2017) सारखाच आहे. हा स्मार्टफोन आऊट ऑफ द बॉक्स EMUI 5.0 बेस्ड अँड्रॉईड 7.0 नूगट वर चालतो. यामध्ये ड्युअल हायब्रिड सिम सपोर्ट देण्यात आला आहे.
Honor 8 Lite मध्ये 2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शनसोबत 5.2 इंच फुल HD (1080X1920 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम देण्यात आला असून इंटरनल स्टोरेज 64GB देण्यात आली आहे. ही मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेऱ्याचा विचार केला तर Honor 8 Lite मध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ब्लूटुथ, वाय-फाय सुविधा असून यामध्ये 3999mAh बॅटरी देण्यात आली आहे.