जिओचा ७ महिने व्हॅलिडिटीसोबत स्वस्त नवीन प्लान, अमर्याद सेवा

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा धकमा केलाय. ७ महिने व्हॅलिडिटीबरोबर स्वस्त नवीन योजना लागू केलेय. या योजनेनुसार जिओ प्राईम ग्राहकाला ३८० जीबी डाटा मिळणार  आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 29, 2017, 07:33 PM IST
जिओचा ७ महिने व्हॅलिडिटीसोबत स्वस्त नवीन प्लान, अमर्याद सेवा title=

मुंबई : रिलायन्स जिओने पुन्हा एकदा धकमा केलाय. ७ महिने व्हॅलिडिटीबरोबर स्वस्त नवीन योजना लागू केलेय. या योजनेनुसार जिओ प्राईम ग्राहकाला ३८० जीबी डाटा मिळणार  आहे.

जिओने ४जी सेवा लागू केल्यापासून नवनवीन योजना आणत धमाका केलाय. जिओने ४ जी Volte फीचर फोन आणला. जिओचा नवा ४जी फोन १५०० रुपयांत मिळणार आहे. हे पैसे तीन वर्षानंतर ग्राहकाला परत दिले जाणार आहेत. आता त्यापुढे पाऊल टाकते ३८० जीबी डाटा ७ महिन्यांसाठी मिळणार आहे.

रिलायन्स जिओने २१० दिवसांसाठी म्हणजेच ७ महिन्यांसाठी वैधता असणारी योजना लागू केलेय. यानुसार ३८० जीबी डाटा मिळणार आहे. ही योजना प्राईम सदस्यांना मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ४,९९९ रुपये द्यावे लागतील. यात ग्राहक मोफत अमर्यादीत कॉलिंग, रोमिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच जिओ अॅप्सची सुविधा मिळू शकते. याच्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही.