Maruti बाजारात आणणार 7 सीटर कार, Innova-Ertiga कंपन्याना देणार टक्कर

Maruti 7 Seater Car:  मारुती सुझुकी (Maruti 7 Seater Car) यावर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार टोयोटा इनोव्हा आणि एर्टिगा सारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. मारुतीच्या या नवीन एमपीव्हीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात. 

Updated: Feb 21, 2023, 04:41 PM IST
Maruti बाजारात आणणार 7 सीटर कार, Innova-Ertiga कंपन्याना देणार टक्कर  title=

Maruti 7 Seater Car: देशातील सर्वांत मोठी कार कंपनी असलेली मारूती सुझूकी (Maruti Suzuki) नवनवीन कार बाजारात आणत असते. तसेच ग्राहकांपर्यंत चांगली आणि दर्जेदार कार पोहोचावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे मारूती आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवनवीन अपडेट करत असते. तसेच कंपनी एसयूव्ही कारसह एमपीव्ही कार्सवरही भर देते. मारुती सुझुकी (Maruti 7 Seater Car) यावर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार टोयोटा इनोव्हा आणि एर्टिगा सारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. मारुतीच्या या नवीन एमपीव्हीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात. (maruti suzuki will launch innova hycross based mpv in india)

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) एमपीव्हीची रचना इनोव्हा हायक्रॉसपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. विशेष म्हणजे ADAS (Advanced Driver Assistance System) तंत्रज्ञानासह येणारी ही मारुती सुझुकीची पहिली कार असेल. यात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांसारखी वैशिष्ट्ये असणार आहेत. 

'या' दिवशी येणार बाजारात

पॉवरट्रेन सेटअपमध्ये समान 2.0L, 4-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल हायब्रीड (184bhp, ई-ड्राइव्ह ट्रान्समिशन) आणि 2.0L पेट्रोल युनिट (172bhp/205Nm, एक CVT गिअरबॉक्स) इनोव्हा हायक्रॉस वरून नेले जाईल. मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह, ही MPV प्रति लिटर 23.24 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देईल.मारुतीची ही कार काही महिन्यांपूर्वी आलेल्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. 2023 च्या सणासुदीच्या हंगामात हे बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

सेफ्टी फिचर्स 

मारुतीच्या (Maruti Suzuki) नवीन MPV मध्ये 6 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी सेफ्टी फिचर्स आहेत.यात 7 आणि 8-सीटर अशी दोन सीटिंग कॉन्फिगरेशन असतील. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस प्रमाणे सेफ्टी फिचर्स आहेत. 

किंमत किती? 

नवीन MPV मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) लाइनअपमध्ये XL6 च्या वर बसेल. XL6 ची किंमत रु. 11.41 लाख ते रु. 14.67 लाख आहे. मारुतीच्या या नवीन MPV ची किंमत सुमारे 20 लाख रुपयांपासून सुरू होऊन 30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या Nexa डीलरशिपद्वारे त्याची विक्री केली जाईल.

दरम्यान ही कार नेमकी बाजारात कधी येणार आहे हे कळू शकले नाही आहे. मात्र 2023 मध्ये सणासुदीत ही कार लॉंच होण्याची शक्यता आहे.