Google Maps ची ही ट्रिक तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करेल मदत, कसं जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला Google Maps ची अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा रोड टॅक्स देखील वाचवू शकता.

Updated: Mar 1, 2022, 04:53 PM IST
Google Maps ची ही ट्रिक तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करेल मदत, कसं जाणून घ्या title=

मुंबई : गुगल मॅप्स हे प्रवास करताना प्रत्येकासाठी लाइफ सेव्हर आहे. गुगल मॅप पूर्वी कुठेही जाण्यासाठी आपल्याला बरीच माहिती घ्यावी लागायची. तसेच रस्त्यात देखील अनेक लोकांना विचारायाला लागाचं, ज्यामुळे बरेच प्रॉब्लम्स यायचे. परंतु गुगल मॅप आपल्या त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यापासून ते आपल्या तेथे पोहोचण्यापर्यंत लागणारा वेळ आणि अंतर देखील दाखवते. ज्यामुळे लोकांना याचा फायदाच होतो.

तसेच आज आम्ही तुम्हाला Google Maps ची अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा रोड टॅक्स देखील वाचवू शकता.

आता गुगल मॅपवरील हे फीचर कोणते आणि ते कंस काम करतं, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे हे गुगल मॅपचे वैशिष्ट्य?

जेव्हाही तुम्ही Google Maps वर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग शोधता तेव्हा तो सहसा सर्वात कमी वेळ घेणारा  म्हणजेच तुम्ही लवकरत तुमच्या निश्चित स्थानावर कसे पोहोचाल असा मार्ग दाखवतो.

काहीवेळा या मार्गांमध्ये महामार्ग आणि टोल कर यांचाही समावेश होतो. मात्र, तुम्ही गुगल मॅपच्या सेटिंगमध्ये थोडासा बदल करून तुमचा टोल टॅक्स वाचवू शकता. ज्यामुळे गुगल तुम्हाला गंतव्यस्थानावर पोहोचण्याचा मार्ग दाखवेल, ज्यामध्ये टोल प्लाझा येत नाही. परंतु हे लक्षात घ्या की, काहीवेळा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल, तेथे असा कोणताही विना टोलचा मार्ग नसेल, तर त्यावेळी हे फीचर तुमच्यासाठी काही कामाचं राहाणार नाही.

गुगल मॅपच्या या ट्रिकमुळे टोल टॅक्स वाचणार

सर्वप्रथम, तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण Google Maps मध्ये शोधा.

आता खाली दिलेल्या डायरेक्शन पर्यायावर टॅप करा.

तुम्ही तुमचे वर्तमान स्थान किंवा इतर कोणतेही स्थान प्रारंभ बिंदू म्हणून निवडू शकता.

आता नकाशा तुम्हाला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद मार्ग सुचवेल.

येथे तुम्हाला उजवीकडे दिलेल्या थ्री-डॉट मेनू वर टॅप करावे लागेल.

आता शीर्षस्थानी दिलेल्या मार्ग पर्यायांवर टॅप करा.

येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी Avoid Tolls चालू करा.

आता गुगल मॅप तुम्हाला कोणत्या मार्गावर टोल प्लाझा येत नाही तो मार्ग दाखवेल.