ट्विटरने लॉन्च केले एक नवे फिचर...

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर ने भारतातील सर्व युजर्ससाठी मोमेंट्स हे फिचर लॉन्च केले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 16, 2017, 08:47 PM IST
ट्विटरने लॉन्च केले एक नवे फिचर... title=

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर ने भारतातील सर्व युजर्ससाठी 'मोमेंट्स' हे फिचर लॉन्च केले. फेसबुकने हे फिचर काही खास लोकांसाठी लॉन्च केले होते. म्हणजे प्रभावी व्यक्ती, ट्विटर चे सहयोगी आणि विविध ब्रॉंड्स यांचा समावेश आहे.

काय आहे हे फिचर ?

मात्र आता हे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रोफाईलमध्ये एक वेगळी टॅब ओपन होते. ज्यामुळे तुम्ही बातम्या आणि  ब्रेकिंग न्यूजशी जोडू शकता.  ट्विटर इंडिया ने सांगितले की, सुरूवातीला मोमेंट्स हे फक्त फिचर सहयोगींना उपलब्ध होते. आता मात्र ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

एक नवीन टॅब सुरू

मोमेंट्स शिवाय ट्विटर ने बातम्या, मनोरंजन आणि खेळासाठी एक नवीन ‘एक्सप्लोवर’टॅब सुरू केली आहे. यामुळे नवीन ‘मोमेंट्स’शोधणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर सर्वात चांगले ट्वीट्स शोधणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला, संस्थेला फॉलो करणे गरजेचे नाही.

काय आहे फायदा?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ट्विटर किंवा ट्विटर लाईट च्या एक्सप्लोरर टॅबवर जाऊन दिवसभरातल्या स्टोरीज शोधू शकता.