Alien On Mars : एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. खरचं या जगात एलियन अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत कायमच संभ्रम आहे. अशातच आता एक खळबळजनक दावा समोर आले. मंगळ ग्रहावर 50 वर्षांपूर्वी एलियन सापडला होता. मात्र, NASA च्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजन दावा बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील एका वैज्ञानिकाने केला आहे.
बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीचे डर्क शुल्झे-माकुच यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. NASA या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेताना एक प्रयोग केला होता. या प्रयोगादरम्यान एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे. NASA च्या प्रयोगाबाबतची सविस्त माहिती देत डर्क शुल्झे-माकुच यांनी NASA च्या चुकीमुळे कशा प्रकारे एलियनचा मृत्यू झाला हे पटवून देण्याचा प्रयोग केला होता.
1970 साला दरम्यान नासाने मंगळ ग्रहावर वायकिंग मिशन राबवले होते. नासाच्या वायकिंग मोहिमेतील दोन लँडर मंगळ ग्रहावर उतरले होते. 20 जुलै 1976 रोजी वायकिंग 1 तर, 3 सप्टेंबर 1976 रोजी वायकिंग 2 हे मंगळावर उतरले होते. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेणे हे वायकिंग मोहिमेचे उद्दिष्ट होते. याअनुषंगाने मंगळावरील मातीत पाणी मिसळण्यात आले. तसेच कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या मदतीने देखील मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळ ग्रहावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. येथील एलियन हे पाण्याशिवाय जिवंत राहत होते. नासाच्या प्रयोगादरम्यान मंगळ ग्रहावर कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूचे रिएक्शन होवून hitch-hikers च्या संसर्गामुळे एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे. वायकिंग 1 आणि वायकिंग 2 हे सध्या सक्रिय नाहीत. मात्र, त्यांचे अवशेष मंगळ ग्रहावर आहेत.
अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं केला होता. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश गुप्तपणे एलियन्सच्या संपर्कात आहेत.
एलियन्सची 'गेलेक्टिक फेडरेशन' नावाची स्वतंत्र संघटना आहे. मंगळ ग्रहावर एक अंडरग्राऊंड अंतराळ स्थानक आहे. त्याठिकाणी अमेरिकन अंतराळवीर आणि एलियन्स एकत्र काम करतात असे दावे इस्रायलच्या अंतराळ सुरक्षा कार्यक्रमाचे माजी प्रमुख हाइम इशेद यांनी केले होते.