ब्रिटनमध्ये अपघातात ८ भारतीयांचा जागीच मृत्यू

ब्रिटनमध्ये मिनीबस आणि एका लॉरीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ८ भारतीय जागीत मृत्यूमुखी पडले आहेत. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे. 

Updated: Aug 28, 2017, 09:43 AM IST
ब्रिटनमध्ये अपघातात ८ भारतीयांचा जागीच मृत्यू title=

लंडन : ब्रिटनमध्ये मिनीबस आणि एका लॉरीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ८ भारतीय जागीत मृत्यूमुखी पडले आहेत. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे. 

गेल्या २४ वर्षातला ब्रिटनमधला हा अपघात सर्वात भीषण अपघात असल्याचे म्हटले जात आहे. बकिंगहॅमशायर मधील न्यूपोर्ट पॅगनेल येथे हा अपघात झाला. विप्रो कंपनीच्या आयटी प्रोफेशनल्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसची दोन लॉरींसोबत धडक झाली. यात विप्रोचे ३ कर्मचारी जागीच ठार झाले तर चौथा कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय बसचालकही या अपघातात ठार झाला.

दोन्ही लॉरीचालकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. 'कार्तिकेयन रामसुब्रमण्यम पुगलर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भास्करन अशी ठार झालेल्या आमच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत,' असे विप्रोचे युकेचे ऑपरेशन्स हेड रमेश फिलीप्स यांनी सांगितले.