जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर 'ती' चक्क कडाडून भांडू लागली!

चीनमधल्या एका भयानक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 7, 2017, 09:11 AM IST
जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर 'ती' चक्क कडाडून भांडू लागली! title=

चीन : चीनमधल्या एका भयानक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 भयानक अपघाताचा प्रकार कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. दुचाकीवर स्वार असलेली महिला एका मोठ्या ट्रकच्याखाली आली. ती ट्रकच्या चाकांमध्ये अडकली आणि काही फूट अंतरावर अक्षरश: फरफटत गेली. मात्र तिचं दैव बलवतर म्हणून त्यातून ती थोडक्यात बचावली. 
या सगळ्या प्रकारात आर्श्चयाची गोष्ट म्हणजे या जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर ती ट्रक चालकाशी कडाडून भांडू लागली. या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.