Stealth Omicron चा अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कहर, भारतासाठी किती धोका?

Stealth Omicron Virus : WHO चे अधिकारी मारिया वॅन केरखोव यांनी जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Updated: Mar 28, 2022, 05:03 PM IST
Stealth Omicron चा अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कहर, भारतासाठी किती धोका? title=

Stealth Omicron Virus : कोरोना पुन्हा एकदा चिंता वाढवत आहे. ओमायक्रॉनच्या स्टील्थ वेरिएंट (Stealth Omicron) पुन्हा एकदा झपाट्याने पसरु लागला आहे. अमेरिका (US), ब्रिटेन (UK) आणि चीन या देशांमध्ये ओमायक्रॉनचा सब वेरिएंट स्टील्थ कहर करत आहे. त्यामुळे भारतात देखील चिंता वाढत आहे. येणाऱ्या काही दिवसात कोरोना पुन्हा एकदा चिंतेचं कारण बनण्याची चिन्ह आहेत. देशात कोरोनाची चौथी लाट (coronavirus 4th wave india) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WHO चे अधिकारी मारिया वॅन केरखोव यांनी जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे त्याला हलक्यात घेऊ नका. ओमायक्रॉनचा वेरिएंट स्टील्थ ओयमाक्रॉन अधिक संसर्ग करणारा आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

कोविड-19 चा आणखी एक वेरिएंट बीए.2 देखील कोरोनाचा संसर्ग वाढण्याचं प्रमुख कारण आहे. अमेरिकेत देखील आता संसर्ग झपाट्याने वाढू लगला आहे. अमेरिकेत दररोज 28 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत.

यूरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जर्मनीमध्ये 3 लाख प्रकरण येत आहे. जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. इटली आणि फ्रान्समध्ये दीड लाखाहून अधिक रुग्ण वाढत आहेत.

Omicron' variant scare: Maharashtra issues new COVID-19 guidelines, check  rules | India News | Zee News

भारतात किती धोका?

भारताचा शेजारील देश चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये अनेक शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतात मात्र दिलासादायक परिस्थिती आहे. देशात सध्या कोरोनाचे 15,859 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 98 टक्के आहे. भारतात सध्या जरी कोणताही धोका नसला तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु झाल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.