चोर- पोलिसांची भागम-भाग पाहून तुम्हीही व्हाल हैराण 'हा' कुठल्या सिनेमातील Video नाही

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की, हा कुठल्या सिनेमाचा सीन तर नाही ना. 

Updated: Aug 23, 2022, 12:31 PM IST
चोर- पोलिसांची भागम-भाग पाहून तुम्हीही व्हाल हैराण 'हा' कुठल्या सिनेमातील Video नाही title=
trending video you will also be shocked after watching chor & police viral video on social media

Trending Videos: पोलीस म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. पण पोलीस आणि चोऱ्यांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.पंजाबमध्ये दिवसाढवळा चोरांचा पाठलाग करताना पोलिसांचा व्हिडीओ आपण काही दिवसांपूर्वी पाहिला होता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की, हा कुठल्या सिनेमाचा सीन तर नाही ना. पण थांबा हा कुठल्याही सिनेमाचा सीन नाही आहे. तर हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या माणसाने पोलिसांना काय मस्त चकवा दिला आहे. (trending video you will also be shocked after watching chor & police 
viral video on social media)

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिसांची व्हॅन एका बाइकस्वाराचा पाठलाग करत आहे. काही अंतरावर बाइकस्वार डावीकडे वळतो आणि त्याचा पाठीमागे पोलिसांची गाडीही वळते. पण पुढे जे होतं ते पाहून तुम्ही हसूहसून लोटपोट व्हाल.

आतापर्यंत या व्हिडीओला  2.8 कोटी लाइक्स मिळाले आहेत. तर या व्हिडीओला तुफान व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमधील व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून जसा निसटतो हे पाहून पोलिसही अवाक होऊन जातात. पोलिसांनी काही कळेपर्यंत तो व्यक्ती कुठल्या कुठे निघून गेला असतो. 

हा व्हिडिओ पाहून, एक यूजर्स म्हणतो की, ''जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा 100% वापर करता तेव्हा असे होते.'' तर दुसरा लिहतो की, ''भाई खऱ्या आयुष्यात जीटीए खेळत आहे.'' ''परफेक्ट यू टर्न'', अशीही कमेंट या व्हिडीओला आली आहे.