शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'

'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar

Jul 22, 2024, 18:04 PM IST
कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?

कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?

कधीकाळचे राजकीय शत्रू 2 मित्र आता एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजकारण अशा अनेक गोष्टींचे साम्य दोघांमध्ये आहे.

Jul 22, 2024, 08:18 AM IST
 उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल

Jul 21, 2024, 19:52 PM IST
4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला

4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Jul 21, 2024, 18:41 PM IST
रोहीत पाटलांपाठोपाठ  शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार

रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार

रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.

Jul 19, 2024, 23:33 PM IST
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय.. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या लढ्याला यश मिळालंय

Jul 19, 2024, 23:06 PM IST
छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी

Maharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

Jul 19, 2024, 18:55 PM IST
'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला

'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला

Sharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर

Jul 18, 2024, 09:47 AM IST
पवार-ठाकरेंचं फसलेलं स्टार्टअप! 'पुन्हा त्या नादाला लागायच नाही हे ठरवलं', शरद पवारांनी सांगितला किस्सा

पवार-ठाकरेंचं फसलेलं स्टार्टअप! 'पुन्हा त्या नादाला लागायच नाही हे ठरवलं', शरद पवारांनी सांगितला किस्सा

Thackeray Pawar Startup: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. शरद पवारांनी नुकतीच त्यातली एक आठवण सांगितली.

Jul 17, 2024, 13:19 PM IST
Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय

Jul 16, 2024, 21:04 PM IST
राज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?

राज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?

अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आज खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत

Jul 16, 2024, 10:33 AM IST
महायुतीत छगन भुजबळ अस्वस्थ? शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग

महायुतीत छगन भुजबळ अस्वस्थ? शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग

Maharashra Politics : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आरक्षणाबाबत भेट झाल्याचं भुजबळ सांगत असले तरी भुजबळांच्या मनात नेमकं काय

Jul 15, 2024, 20:38 PM IST