शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

Jul 15, 2024, 13:17 PM IST
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Jul 15, 2024, 11:34 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते. 

Jul 15, 2024, 10:55 AM IST
'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार

Jul 13, 2024, 11:09 AM IST
महाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण?

महाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण?

Vidhan Parishad Election result  : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धक्का दिला असून महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत.  

Jul 12, 2024, 18:57 PM IST
Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

Maharastra Politics : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या होणारी निवडणूक (Vidhanparishad Election scenario) अत्यंत चुरशीची ठरणाराय.  या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं

Jul 11, 2024, 20:42 PM IST
'अबकी बार 225 पार', विधानसभा निवडणुकीबाबत पवारांचं भाकित

'अबकी बार 225 पार', विधानसभा निवडणुकीबाबत पवारांचं भाकित

राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित व्यक्त केलं आहे. 

Jul 11, 2024, 19:12 PM IST
Sharad Pawar Hints Rohit Patil  to Get Ticket For Vidhan sabha Election

Political News | रोहित पाटलांना उमेदवारी?

Sharad Pawar Hints Rohit Patil to Get Ticket For Vidhan sabha Election

Jul 09, 2024, 10:25 AM IST
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...

मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे.   

Jul 08, 2024, 19:08 PM IST
Sharad Pawar, Ajit Pawar participate in Tukaram Maharaj Palakhi

शरद पवार, अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी होणार

Sharad Pawar, Ajit Pawar participate in Tukaram Maharaj Palakhi

Jul 07, 2024, 10:35 AM IST
Vidhansabha2024 There is still suspense regarding the Legislative Council elections

Vidhansabha2024: विधानपरिषद निवडणुकीबाबत अजूनही सस्पेन्स कायम

Vidhansabha2024 There is still suspense regarding the Legislative Council elections

Jul 02, 2024, 12:25 PM IST
अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार

अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार

विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.  14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. 

Jul 01, 2024, 19:44 PM IST