प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, बाळाचा फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्रीच्या घरी आनंदाचे वातावरण

Updated: Nov 20, 2021, 08:04 AM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, बाळाचा फोटो शेअर करत म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा आई झाली आहे. एवलिनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एवढंच नाही तर एनलिनने मुलीचा फोटो देखील शेअर केला आहे. मुलीची पहिली झलक शेअर करत तिने कॅप्शन मध्ये, 'माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वापूर्ण भूमिका...' असं लिहीलं आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने मुलीचा इन्स्टा डेब्यू देखील केलं आहे. 

सध्या एवलिनची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. सोनल चौहान, एली अवराम, निलानितीन मुकेश, क्लॉडिया यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी एवलिनला आई झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एव्हलिनने आपल्या मुलीला आपल्या मिठीत घेतले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आईचे मुलीसोबतचे नाते हृदयाला स्पर्श करणारं असतं. महत्त्वाचं म्हणजे एवलिनला आधीच माहित होते की तिला मुलगी होईल. एव्हलिनने प्रसूतीपूर्वीच बाळाचं लिंग उघड केले होते. आई झाल्यानंतर एवलिन आणि तिच्या पतीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

एवलिनचे लग्न ऑस्ट्रेलियन सर्जन डॉ. तुषान भिंडीशी झाले आहे. यंदाच्या वर्षी मे महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. 7 जून रोजी या जोडप्याने लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.