Actress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!

Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

Updated: Jan 6, 2023, 08:22 PM IST
Actress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर! title=

Actress Extra Marital Affair : बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Stars) आणि छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी हे नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. त्यात असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे आरोप त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं केले होते. (Actress Extra Marital Affair This big actress had an affair with another man while she was with her husband latets marathi news)  

काम्या पंजाबीवर (Kamya Punjabi) तिचा पूर्वाश्रमीचा पती बंटी नेगीनं विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता. बंटी नेगीनं काम्यावर संजय दत्तचा चुलत भाऊ आणि अभिनेता निमाई बालीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. मात्र, काम्यानं हे आरोप खोटे ठरवत घटस्फोटानंतर ती आणि निमाई बाली रिलेशनशिपमध्ये आल्याचे सांगितले होते.

काम्या ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखले जाते. देशभर तिचे अनेक चाहते असून ती आता 43 वर्षांची आहे. पंजाबमधील टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक पात्रांसाठी फेमस आहे. घटस्फोटानंतर काम्या आणि करण पटेलच्याही प्रेम-प्रकरणाच्या चर्चा होत्या. करणने तिला प्रेमामध्ये फसवल्याच्याही अनेक चर्चा होत्या.
 
दरम्यान,  टीव्ही जगतात पाऊल ठेवल्यानंतर दोन वर्षांनी काम्या पंजाबीने 2003 मध्ये बिझनेसमन बंटी नेगीशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या आणि 2006 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिली आणि त्यानंतर 2009 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मात्र, 10 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर दोघेही 2013 साली एकमेकांपासून वेगळे झाले. आणि त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी शलभ डांगसोबत दुसरे लग्न केलं होतं.