नेहा धुपियानंतर आता 'या' अभिनेत्रीने दिली गोड बातमी

कोण आहे ही अभिनेत्री 

नेहा धुपियानंतर आता 'या' अभिनेत्रीने दिली गोड बातमी  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सगळीकडे सध्या आनंदच आनंद आहे. एकीकडे दीपवीरचं लग्न तर दुसरीकडे नेहा धुपियाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेहा धुपियापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

इमरान हाशमीसोबत अभिनय केलेल्या या अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे उदिता गोस्वामी. उदिताचं हे दुसरं बाळ आहे. या आधी तिला एक मुलगी आहे. आता तिने मुलाला जन्म दिला आहे. 

उदिताचा नवरा मोहित सूरी हा भट्ट कॅम्पमधील सिनेमा दिग्दर्शित करतो. फिल्ममेकर मिलाप जावेरीने उदिता आणि मोहित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुलगा झाला म्हणून शुभेच्छा, मुलाला अनेक आशिर्वाद... गोंडस मुलाच्या फोटोची वाट पाहत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Part 2 of the cropped pic. What kept me busy and missing in action. Pic by @shrutitejwaniphotography

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pic by @shrutitejwaniphotography

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami) on

उदिताचं फिल्मी करिअर काही खास राहिलेलं नाही. बॉलिवूडमधील हँडसम हंक जॉन अब्राहमसोबत 'पाप' या सिनेमात लीड रोल उदिताने केला होता. हा सिनेमा पूजा भट्टने दिग्दर्शित केला होता.