'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...'

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने भाष्य केलं आहे. या व्हिडीओबद्दल अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलंय. 

नेहा चौधरी | Updated: Aug 12, 2024, 11:29 AM IST
'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...' title=
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce deepfake Video Abhishek Bachchan broke his silence

Aishwarya Rai Abhishek Bachchan Deepfake Video: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (aishwarya rai bachchan) यांच्या घटस्फोटासंदर्भातील बातम्या सतत सोशल मीडियावर परसरत असतात. नुकताच सोशल मीडियावर अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये अभिषेक बच्चन म्हणाला की, आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. या व्हिडीओनंतर चाहत्यांचा भुवया उंचावल्यात. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि आराध्या या दोघी अभिषेक बच्चनसोबत असो किंवा कुटुंबातील इतर सदस्य अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan)  यांच्यासोबत दिसली नाही. खास करुन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अंबानी यांच्या लग्नातही ऐश्वर्या लेकीसोबत वेगळी आली आणि संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं. पण त्या फेममध्ये सून आणि नात नव्हती. अशात अभिषेक बच्चन याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce deepfake Video Abhishek Bachchan broke his silence)

पण थांबा आम्ही तुम्हाला सांगतो, हा व्हिडीओ अभिषेकच्या घटस्फोटाची पुष्टी करण्यासाठी AI वापरून हा बनावट व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलंय. ऐश्वर्याशी असलेल्या नात्याबद्दल अभिषेक स्पष्ट बोलला आहे. 'तो अजून विवाहित असल्याचा म्हणाला' आहे. 

नेमकं काय म्हणाला अभिषेक?

बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवून घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या असून 'अजूनही विवाहित आहे.' असं म्हटलंय. तो पुढे म्हणाला की, 'तुम्हा सर्वांना त्याबद्दल मला काही सांगायचं नाही. तुम्ही सर्वांनी सर्व गोष्टी अतिशय योक्ती करुन मांडल्या आहेत, दुर्दैवाने. तुम्ही असं का करता ते मला समजत. तुम्हाला काही बातम्या फाइल कराव्या लागतात. हे ठीक आहे, आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हाला ते स्वीकारावं लागेल. व्हायरल झालेला व्हिडीओ बनावट आहे हे स्पष्ट झालंय.

हेसुद्धा वाचा - Fact Check: 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'; अभिषेक बच्चनचा Video Viral

पॅरिसमध्ये नीरज चोप्राला मारली मिठी 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अभिषेक बच्चन भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिताना दिसून आला. नीरज चोप्रा याला रौप्य पदक मिळल्यानंतर त्याने अभिषक बच्चनला जाऊ मिठी मारली.

अभिषेकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो आगामी 'किंग' चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. याशिवाय तो रेमो डिसूजाच्या 'बी हॅप्पी' या चित्रपटातही झळकणार आहे. तो शुजित सरकारच्या पुढील चित्रपटाचाही एक भाग असेल.