अजय देवगनचं नवं घर अमिताभ बच्चन यांच्या घरापेक्षाही महागडं

गेल्या वर्षापासून अजय  आणि अभिनेत्री काजोल नव्या घराच्या शोधात होते. 

Updated: May 31, 2021, 04:11 PM IST
अजय देवगनचं नवं  घर अमिताभ बच्चन यांच्या घरापेक्षाही महागडं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढतं कुटुंबाला वेळ देत असतो. अजयने नुकताचं मुंबईत एक घर घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजयने विकत घेतलेल्या नव्या घराची किंमत 60 कोटी  रूपये आहे. जुहू याठिकाणी त्याने घर घेतलं आहे. गेल्या वर्षापासून अजय  आणि अभिनेत्री काजोल नव्या घराच्या शोधात होते. अजय देवगनच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

रिअल स्टेट व्यवसायाशी संबंधित सूत्रांचे मत आहे की ही सुमारे 60 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर अजय आणि काजोल यांच्या नव्या घरा शेजारी अक्षय कुमार (Akshay Kumar), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं देखील घर आहे. 

बिग बींनी नुकताचं 31 कोटी रूपयांचं घर घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 5184 स्केवअर फूटचं नवं घर खरेदी केलं आहे.  बिग बींनी तब्बल 62 लाख रुपये एवढे या जागेच्या स्टाम्प ड्युटीच्या रुपात भरले आहेत. या संपूर्ण आलिशान घराती किंमत ही एकूण 31 करोड रुपये आहे.