VIDEO : रणबीर कपूरसोबत लग्नाच्या अफवांवर बोलली आलिया भट्ट

काय म्हणाली आलिया 

VIDEO : रणबीर कपूरसोबत लग्नाच्या अफवांवर बोलली आलिया भट्ट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या आणि रणबीर कपूरच्या लग्नांच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलण पसंद केलं आहे. आलिया आणि रणवीरच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून अफवा येत आहे. एका बाजूला बॉलिवूडमध्ये लग्नांचा सिझन सुरू असताना आता चाहत्यांना आलिया-रणवीरच्या लग्नाची घाई असल्याचं स्पष्ट होतंय. 

पण या सगळ्या प्रश्नांवर आलिया तुर्तास तरी वाट पाहावी लागेल असं उत्तर देत आहे. आलिया एका कार्यक्रमात गेली असता तिला लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने चाहत्यांना आणि शुभचिंतकांना या लग्नाच्या बातमीसाठी तरी तुर्तास थांबाव लागणार आहे.

अशी चर्चा होती आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 2019 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. पण आता चाहत्यांना वाट पाहावी लागणार असं दिसत आहे. आलियाने रविवारी लक्स गोल्डन रोज अॅवॉर्डस 2018 मध्ये मीडियामध्ये सांगितलं की, जर लोकं माझ्या लग्नाची वाट पाहत अशतील तर त्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Alia excited for Pc & Nick's wedding #instabolly #bollywood

A post shared by Bollywood (@lnstabolly) on

आलिया - रणबीरच्या लग्नाची खूप चर्चा आहे. आनंद अहुजा आणि सोनम कपूरच्या रिसेप्शनला दोघं अगदी हातात हात घालून जाताना दिसले. एवढंच काय तर रणबीरच्या आजीच्या निधनाच्यावेळी देखील आलिया हजर होती. तसेच ऋषी कपूर यांनी अमेरिकेत उपचाराकरता नेल्यानंतर तिकडे देखील आलिया कपूर कुटुंबासोबत दिसली.