'आपना टाईम आयेगा' गाण्यावर मुलाचा भन्नाट डान्स; रणवीर पाहाताचं म्हणाला...

रणवीर कपूरने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Updated: Oct 8, 2021, 02:47 PM IST
'आपना टाईम आयेगा' गाण्यावर मुलाचा भन्नाट डान्स; रणवीर पाहाताचं म्हणाला...

मुंबई :  2019 साली प्रदर्शित झालेल्या 'गलीबॉय' चित्रपटाला सर्वांना वेड लावलं. एवढंच नाही तर चित्रपटातील गाणी अत्यंत प्रेरणा देणारी असल्यामुळे गाणी देखील आजपर्यंत चाहत्यांच्या ओठांवर आहेत. नुकताचं रणवीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा 'आपना टाईम आयेगा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'हा लहान मुलगा... माझा छोटा भाऊ...  लव्ह इट....' असं त्याने लिहिलं आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा '83' चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार आहे. '83' चित्रपट, 1983 मध्ये वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.