विवाहित माणसावर प्रेम करण्याच्या यातना काय असतात, 'या' अभिनेत्रीला विचारा

समाजानं तिला कुलक्षणी ठरवली 

Updated: Apr 6, 2022, 05:16 PM IST
विवाहित माणसावर प्रेम करण्याच्या यातना काय असतात, 'या' अभिनेत्रीला विचारा  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण, अनेकदा प्रेमाच्या भरात आपण नकळच चुकीची पावलं उचलतो आणि याच्या अंतिम वळणावर मात्र हाती निराशाच आलेली असते. व्यक्ती कोणतंही अपयश पचवेल, पण प्रेमात मिळालेलं अपयश पचवण्यासाठी मन घट्ट करावं लागतं. (Love Relationship )

त्यातही प्रेमाचं नातं जेव्हा कोणाचा संसार उध्वस्त करतं तेव्हा मात्र समाजही अमुक एका व्यक्तीकडे गुन्हेगाराच्या नजरेतून पाहू लागतो. एका लोकप्रिय अभिनेत्रीला या सर्व प्रसंगांचा सामना करावा लागला होता. 

एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्रीचं दिग्दर्शक- डान्सरशी असणारं प्रेमाचं नातं त्याच्या वैवाहिक जीवनात वादळ आणण्यास कारणीभूत ठरलं. ही अभिनेत्री आहे, नयनतारा. 

कलाजगतामध्ये नयनतारा आणि प्रभुदेवा यांचं नातं बरंच गाजलं. विवाहित असतानाही तो नयनताराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. तिच्यासोबतही काही वेगळं घडलं नव्हतं. 

त्यांची ही वाढती जवळीक प्रभुदेवाची पत्नी, लता हिच्या मनात कल्लोळ माजवत होती. अखेर प्रभुदेवानंच या नात्यातून विभक्त होण्याचा पर्याय निवडला. 

लतानं नयनतारावर गंभीर आरोप करत मुलाच्याच मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी प्रभूदेवा घर सोडून निधून गेल्याचं सांगितलं. हे सर्व त्यानं नयनताराच्याच सांगण्यावरून केल्याचाही गंभीर आरोप लतानं केला होता. 

Nayanthara से लेकर Tabu तक, साउथ सिनेमा की इन हसीनाओं को मिला 'घर तोड़ने  वाली' का टैग, शादीशुदा मर्दों से लड़ाया था इश्क !!

नयनतारा आणि प्रभुदेवा एका वेळेस लिव्हइन रिलेशनशिपमध्येही होते. पण, या नात्यात असतानाही तिच्यावर लग्न मोडणारी महिला अशा शब्दांत टीका केली जात होती. 

यशाच्या शिखरावर असूनही नयनताराला समाजातील एका वर्गानं सातत्यानं हिणवलं ही तिच्यासाठी अत्यंत वाईट बाब ठरली.