...म्हणून जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली

अभिनेत्री कतरिना कैफने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. 

Updated: Jun 20, 2021, 01:02 PM IST
...म्हणून जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये काम मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. करियर संपत आहे असं वाटल्यानंतर कतरिना अभिनेता सलमान खान समोर रडली. पण तेव्हा सलमानने तिचं धैर्य वाढवलं. तू आता रडत आहेस, पण पुढे जावून हा दिवस आठवला की तू पोट धरून हसशील... असं देखील सलमान म्हणाला. कतरिनाच्या रडण्याचं कारण होतं जॉन अब्राहम. अभिनेता जॉन अब्राहमने कतरिनाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. 

जॉन अब्राहमने कतरिनाला काढून टाकलेल्या चित्रपटाचं नाव 'साया' असं होतं. तिच्या जागी त्याने अभिनेत्री तारा शर्माची निवड केली.  या घटनेनंतर कतरिनाला प्रचंड वाईट वाटलं होतं. एका मुलाखतीत सलमानने यावर खुलासा केला, तो म्हणला, 'जॉनने कतरिनाला चित्रपटातून बाहेर काढलं तेव्हा कतरिना माझ्याकडे आली आणि रडायला लागली. '

पुढे सलमान म्हणाला, 'कतरिना म्हणत होती माझं करियर संपलं. तेव्हा मला असं वाटलं ही पुढे जाऊन मोठी अभिनेत्री होणार मग आता का रडते. तेव्हा मी तिला म्हणालो तू आता रडत आहेस, पण पुढे जावून हा दिवस आठवला की तू पोट धरून हसशील... ' अखेर सलमानचं म्हणणं खरं झालं. आज कतरिना प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

त्यानंतर कतरिना आणि जॉन 'न्यूयॉर्क’ चित्रपटात एकत्र झळकले होते. चित्रपटात जॉन असल्यामुळे कतरिना नाराज होती. तेव्हा कतरिना सलमानकडे गेली आणि म्हणाली चित्रपटात जॉन आहे.  तेव्हा मी तिला म्हणालो, 'तू फक्त सिनेमाची कथा आणि डायरेक्टरवर लक्ष दे.. सह कलाकार तर कुणीही असू शकतो. आता तू अशा जागी आहेस की तू जॉनला काढू शकतेस. पण ते योग्य नाही.' अशाप्रकारे सलमानने  कतरिनाची समज घातली.