बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या Juhi Chawla च्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा

कोट्यवधी रुपयांचा मालक जुही चावलाकडे अनेक महागड्या कार; एका कारची किंमत ऐकून व्हाल हैराण े  

Updated: Nov 13, 2022, 07:59 AM IST
बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या Juhi Chawla च्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा  title=

Happy Birthday Juhi Chawla : 'कयामत से कयामत तक (Qayamat Se Qayamat Tak)', 'इश्क (Ishq)' आणि 'यस बॉस (Yes Boss)' यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जुही चावलाने (juhi chawla daughter) चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. पण 90 च्या दशकातील अभिनेत्रींची जी जादू आहे, ती आजही कमी झालेली नाही. वयाच्या 55 व्या वर्षी देखील जुही चावलाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.  (juhi chawla husband age difference)

आज जुही अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, तिच्या संपत्तीचा आकडा मात्र थक्क करणारा आहे. जुही चावला (juhi chawla miss india) अभिनयातून प्रचंड कमावते. शिवाय जाहिरातींमधूनही जुही तगडी कमाई करते. अभिनय आणि जाहिरातच नाही तर, जुहीचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. रिपोर्टनसार जुही चावलाची एकूण संपत्ती सुमारे 48 कोटी रुपये आहे. (juhi chawla net worth)

जुहीचं भव्य घर
जुही चावलाचं स्वतःचं एक अतिशय आलिशान घर आहे. जुहीचं कोट्यवधी रुपयांचं घर अनेक महागड्या वस्तूंनी सजवलं आहे. शिवाय जुही सोशल मीडियावर घराचे फोटो पोस्ट करत असते. (juhi chawla instagram)

जुहीच्या महागड्या कार
जुही चावलाला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये रु. 1.11 कोटी किमतीच्या Jaguar XLJ आणि रु. 78 लाख किमतीच्या Audi Q7 (Audi Q7) सारख्या आलिशान कारचा समावेश आहे. (juhi chawla new movie)