कंगना रणौतनं इस्रायलच्या राजदूतांची घेतली भेट, म्हणाली 'आजच्या युगाचे रावण...'

Kangana Ranaut Calls Hamas New Age Ravan : कंगना रणौतनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यावेळी कंगनानं हमासला 'आजच्या युगाचे रावण' असे म्हटले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 05:37 PM IST
कंगना रणौतनं इस्रायलच्या राजदूतांची घेतली भेट, म्हणाली 'आजच्या युगाचे रावण...'  title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut Calls Hamas New Age Ravan : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असून त्याची चर्चा जगभरात सुरु आहे. सर्वसामान्यांनपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्यावरून चिंता व्यक्त केली आहे. या सगळ्यात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत देखील शामिल झाली आहे. कंगनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

कंगना रणौतही ही सध्या तिचा आगामी चित्रपट तेजसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्तानं कंगना रणौत दिल्लीत पोहोचली. काल कंगनानं दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले. त्यानंतर आज कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हमासला 'आधुनिक रावण' म्हटले आहे. कंगनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीत ती इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांना भेटल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली की आज संपूर्ण जग, विशेषतः इस्रायल आणि भारत दहशतवादाविरोधात युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहन करण्यासाठी दिल्ली पोहोचली, तेव्हा मला वाटलं की इस्रायल दूतावास जाऊन तिथल्या लोकांची भेट घेतली पाहिजे, जे आजच्या आधुनिक रावणाला संपवत आहेत. ज्या प्रकारे छोट्या मुलांना, महिलांवर निशाणा साधतात. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. मला आशा आहे की दहशतवाद्यांविरोधात इस्रायल विजयी होईल. 

हेही वाचा : 'स्वत:च्या मुलींचे चेहरे कधी दाखवत नाहीस पण...', म्हणत क्रांती रेडकरवर टीका; अभिनेत्रीनं दिलं जशास तसं उत्तर

कंगना विषयी बोलायचे झाले तर दिल्लीच्या रामलीला मैदानात रावण दहन कार्यक्रमात पोहोचली होती. तिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर कंगना नुकतीच तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी 2' मध्ये दिसली होती. तर आता ती लवकरच 'तेजा' आणि 'इमरजेंसी' यात दिसणार आहे. सर्वेश मेवारा दिग्दर्शित 'तेजस' मध्ये कंगना दिसणार असून ती भारतीय वायुसेना ऑफिसर तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर 'एमरजेंसी'मध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.