मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या टॉक शोमुळे चर्चेत आहे. करणच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. या शोमध्ये आलेले सेलिब्रिटी हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे करताना दिसतात. एवढंच काय तर या शोमध्ये प्रत्येक सेलिब्रिटीला एकदातरी त्या काऊचवर बसण्याची इच्छा असते. या काऊचवर करणनं आतापर्यंत बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन ते बॉलिवूडचे खान या सगळ्यांना बोलावलं, पण तुम्हाला माहितीये का? असे दोन सेलिब्रिटी आहेत ज्यांना करण या शोमध्ये कधीच बोलवणार नाही. याचा खुलासा करणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
कॉफी विथ करण हा शो 2005 साली सुरु झाला. सगळ्यात आधी हा शो Star World वर प्रदर्शित झाला. तर या शोचं 7 वं पर्व हे गेल्या महिन्यात सुरु झालं असून सध्याच्या या नवीन सीझनमध्ये आलिया भट, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, समांथा रुथ प्रभू, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, शाहिद कपूर, कियारा अडवाणी अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आजवर या कार्यक्रमात जवळपास सगळेच सेलिब्रिटी एकदातरी आले आहेत. पण या कार्यक्रमात दोन सेलिब्रिटीजना बोलवायचं धाडस करण कधीच करू शकत नाही, असे त्यानं सांगितले.
आणखी वाचा : मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स
करणनं नुकतीच द हिंदूला मुलाखत दिली होती. यावेळी करणनं हा खुलासा केला आहे. 'बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि दिग्दर्शक निर्माता आदित्य चोप्रा यांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचं धाडस कधीच करू शकत नाही, याविषयी खुलासा करत करणं म्हणाला, 'रेखाजी यांना मी एकदा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण रेखा शोमध्ये येण्यासाठी इतक्या उत्साही नव्हत्या, शिवाय त्यांच्या बाबतीत आधीच इतक्या गोष्टींची चर्चा सुरु असते, त्यांची ही सुंदर मिस्ट्री ही तशीच रहायला हवी. त्यामुळे मी त्यांना जास्त फोर्स केलं नाही.'
पुढे आदित्य चोप्राबद्दल बोलताना करण म्हणाला, 'रेखाजी यांना आमंत्रण पाठवायचं धाडस तरी केलं, पण आदित्य चोप्रा यांना मी ते आमंत्रण पाठवायचंही धाडस करू शकत नाही. करण जोहर आदित्य चोप्राला गुरु मानतो, आणि एकंदरच आदित्य चोप्रा यांचा स्वभाव हा अशा कार्यक्रमांसाठी योग्य नसल्यानं करणने आजवर त्याला बोलावलं नाही.'