सलमान खानमुळे कॅटरिना पुन्हा रडली

तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे.  

Updated: Dec 6, 2017, 10:41 PM IST
सलमान खानमुळे कॅटरिना पुन्हा रडली  title=

मुंबई : तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे.  
येत्या २२ डिसेंबर रोजी 'टायगर जिंदा' है या चित्रपटात या दोघांचा रोमान्स आणि अ‍ॅक्शन पाहता येणार आहे. या दोघांची केमेस्ट्री ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन हे दोन्ही विषय चर्चेचा बहग असतो. 

'तेरे  नाम' गाण्यावर रडली कॅटरिना 

कॅटरिना कैफ 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका रिएलिटी शो मध्ये पोहचली होती. तेथे ' तेरे नाम गाणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी तरंगले.  

सलमानने पुन्हा हसवले 

डांस परफॉर्मन्स पाहून भावना विवश झालेल्या कॅटरिनाला सलमान खानने  पुन्हा हसवले. सलमानने 'सुल्तान' चित्रपटातील ' जग घुमिया' गाण्यावर डान्स केला. त्यामधील सिग्नेचर स्टेप पाहून पुन्हा तिच्या चेहर्‍यावर हसू आलं