Riteish Deshmukh post for Manoj Jarange Patil : सध्या संपूर्ण राज्यात एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे - पाटील यांची तब्येत खालवल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक पोस्ट शेअर करत आहेत. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं एक पोस्ट शेअर केली आहे.
रितेशनं त्याच्या एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेशनं मनोज जरांगे - पाटील यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की 'जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.'
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. pic.twitter.com/Qffzej8Y4k— Riteish Deshmukh (@Riteishd) October 30, 2023
रितेशचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. फक्त रितेश नाही तर त्याच्यासोबत मराठी अभिनेता किरण माने यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी आज घोषणा केली की कुणबी पुरावे ज्यांच्याकडे आहेत त्यांना उद्यापासून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होईल. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणतं सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठी हे एकच आहेत. त्यात अर्धे वेगळे आणि अर्धे वेगळं असं नाही, तर जो पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. सरकारने आमचं शांततेलं आंदोलन पाहिलं आहे. आता आंदोलनचा तिसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल मग तर तर त्यांना बैठकाही घेता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.